Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशUS Election 2020 : अमेरिकेत उद्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका, पाहा काय म्हणतंय सर्वेक्षण

US Election 2020 : अमेरिकेत उद्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका, पाहा काय म्हणतंय सर्वेक्षण

दिल्ली | Delhi

एकीकडे जगभरात करोनाने थैमान घातले आहे. तर हळूहळू करण्याची लाट ओसरत असल्यामुळे हळूहळू सर्वच क्षेत्र पुन्हा पूर्ववत होत आहेत. याच करोना संकटाच्या काळात अमेरिकेत सर्वात मोठी निवडणूक म्हणजेच अध्यक्षीय निवडणूक होत आहे. अमेरिकेत उद्या म्हणजेच मंगळवारी (३ नोव्हेंबर) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहे. यंदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्यात अटीतटीची लढाई होणार आहे.

- Advertisement -

अमेरिकेत केलेल्या एका सर्वेक्षनानुसार राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेच्या या नव्या सर्वेक्षणानुसार राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या असणाऱ्या चार राज्यांमध्ये जो बायडेन हे ट्रंप यांच्या पुढे जाताना दिसत आहेत. यात असेही दिसून आले आहे की २०२०चे डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेले बायडेन हे ट्रंप यांच्यापेक्षा १०% गुणांनी आघाडीवर आहेत. बायडेन हे ट्रंप यांच्या तुलनेत २७० इलेक्टोरल मतांचे विजयी लक्ष्य साध्य करण्याची शक्यता जास्त असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय नोंदणीकृत मतदारांमध्ये ट्रंप यांना ४२% लोकांचे समर्थन मिळताना दिसत आहे तर बायडेन यांच्या पक्षात ५२% लोक आहेत. या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की अॅरिझोना, फ्लोरिडा, जॉर्जिया, आयोवा, मेन, मिशिगन, मिनेसोटा, उत्तर कॅरोलीना, न्यू हॅम्पशायर, नेवाडा, पेन्सिल्व्हेनिया आणि व्हिस्कॉन्सिन या १२ जागी बायडेन हे ट्रंप यांच्यापेक्षा ६ गुणांनी पुढे होते. याचाच अर्थ इथे बायडेन यांना ५१% तर ट्रंप यांना ४५% मते मिळताना दिसत आहेत.

निवडणुकीआधीचे हे अंतिम सर्वेक्षण २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले होते ज्यात समोर येत आहे की बायडेन यांच्या बाजूने जे मतदार आहेत त्यात कृष्णवर्णीय मतदार (८७% ते ५%), १८ ते ३४ या वयोगटातील युवा मतदार (६०% ते ३२%), वरिष्ठ मतदार (५८% ते ३५%), महिला (५७% ते ३७%) सामील आहेत. अनेक दशकांपासून रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या टेक्सासमध्येही चित्र बदलताना दिसत आहे. बायडेन आणि कमला हॅरिस या जोडीने इथेही आघाडी मिळवली आहे. आयोवा, जॉर्जिया आणि ओहायोमध्ये बायडेन यांचा विजय, जे ट्रंप यांनी २०१६ मध्ये काबीज केले होते, डेमॉक्रॅट्सची संख्या ३००च्या पुढे नेईल.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी होम-हवन

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यशासाठी मेरळमधील अखिल भारत हिंदू महासभाने होम-हवन केलं आहे. अखिल भारत हिंदू महासभेचे प्रदेश प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की विश्व शांतिसाठी ट्रम्प यांनीच राष्ट्रपती होणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितले की, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कट्टर दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. हिंदू महासभाने ट्रम्प यांना विजय भव: चा आशीर्वाद दिला आहे.

कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन ?

77 वर्षीय बायडन सहा वेळा सिनेटर राहिले आहेत आणि पहिल्यांदा 1972 मध्ये निवडणूक जिंकले होते. अमेरिकेचे 47 वे उपराष्ट्राध्यक्ष असलेले बायडन यांनी यापूर्वी दोन वेळा डेमोक्रेटिक पक्षाने राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली होती.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होणं हजारो लोकांना महागात पडलं आहे. तब्बल 30,000 जणांना करोनाची लागण झाली असून 700 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका रिसर्चमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या रॅलीमुळे आत्तापर्यंत 700 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी आत्तापर्यंत 18 रॅली निघाल्या आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये 30 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. सॅनफोर्ड विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी याबाबत माहिती दिली आहे. रिसर्चमधून या रॅलीमध्ये सहभागी झाल्यामुळे अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी काहींचामृत्यूहीझाला. ट्रम्प यांच्या 20 जून ते 22 सप्टेंबरदरम्यान झालेल्या रॅलीमधून ही माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. रॅलीत सहभागी झालेल्या अनेकांनी मास्कही घातला नव्हता अशी माहिती आता समोर येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या