Wednesday, November 4, 2026
Homeदेश विदेशट्रम्प युगाला मतदारांचा धक्का! अमेरिकेच्या सिनेटवर डेमोक्रॅट्सचा झेंडा, पराभवानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणाले, बहुधा...

ट्रम्प युगाला मतदारांचा धक्का! अमेरिकेच्या सिनेटवर डेमोक्रॅट्सचा झेंडा, पराभवानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणाले, बहुधा काहीतरी…

नवी दिल्ली | New Delhi
अमेरिकेच्या राजकारणात मध्यवधी निवडणुकांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांत मोठा धक्का बसला असून, डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेटवरील नियंत्रण मिळवले आहे. एवढेच नव्हे, तर प्रतिनिधीगृह अर्थात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्येही डेमोक्रॅट्सनी अनेक जागांवर विजय मिळवत बहुमताच्या दिशेने जोरदार मुसंडी मारली आहे. काही राज्यांमध्ये अनेक दशकांनंतर डेमोक्रॅटिक उमेदवार विजयी झाल्याने या निकालांची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील उर्वरित दोन वर्षांच्या राजकीय समीकरणांवर या निकालांचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सिनेटमध्ये रिपब्लिकनची सत्ता संपुष्टात
अमेरिकेच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सनी रिपब्लिकन पक्षाला सत्तेबाहेर केले आहे. निवडणुकीपूर्वी सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाकडे ५३ जागा, डेमोक्रॅट्सकडे ४५ जागा आणि डेमोक्रॅट्ससोबत मतदान करणाऱ्या दोन अपक्ष सदस्यांचे समर्थन होते.

- Advertisement -

सिनेटमध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी डेमोक्रॅट्सना ५१ जागांची आवश्यकता होती. आयोवा, कॅन्सस, टेक्सास, दक्षिण कॅरोलिना, ओहायो आणि नॉर्थ कॅरोलिना या राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यातील जागा जिंकण्यात डेमोक्रॅट्सना यश आले. त्यामुळे सिनेटमधील बहुमताचे समीकरण बदलले आहे.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्येही डेमोक्रॅट्सनी मोठी आघाडी
अमेरिकेच्या संसदेतील कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्येही डेमोक्रॅट्सनी मोठी आघाडी घेतली आहे. निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाकडे या सभागृहात निसटते बहुमत होते. बहुमतासाठी २१८ जागांची आवश्यकता आहे.

असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, डेमोक्रॅट्सनी रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यातील सात जागा उलथवून लावल्या होत्या आणि अनेक जागांवर विजय मिळवण्याची प्रक्रिया सुरू होती. आयोवा राज्यात डेमोक्रॅट्सनी चारपैकी तीन प्रतिनिधीगृहाच्या जागा जिंकल्या. न्यू जर्सी आणि पेनसिल्व्हेनियामध्येही रिपब्लिकन उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सचा दबदबा
गेल्या अनेक दशकांमध्ये प्रथमच कॅन्सस, टेक्सास आणि साउथ कॅरोलिना या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर निवडून आले आहेत. कॅन्ससमध्ये पाद्री अॅडम हॅमिल्टन यांनी रिपब्लिकन उमेदवार रॉजर मार्शल यांचा पराभव करत अनपेक्षित विजय मिळवला. या राज्यात तब्बल ९४ वर्षांनंतर डेमोक्रॅटिक पक्षाला सिनेटची जागा जिंकण्यात यश आले आहे. याशिवाय ओहायो आणि आयोवा या रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या राज्यांमध्येही डेमोक्रॅटिक पक्षाने विजय मिळवत सत्तांतर घडवलं आहे. अशा प्रकारे रिपब्लिकन पक्षाच्या सहा राज्यांमध्ये डेमोक्रॅट्सनी विजय मिळवला आहे.

STORY | Willing to accept results: Trump after facing midterm reversals

US President Donald Trump has said he was willing to accept the results of the mid-term elections, where Democrats posted significant gains, flipping key Senate and gubernatorial races.

“I am absolutely willing to accept those results,” Trump said in an interview with The New York Times on Tuesday night as results trickled in.

Democrats had wrested the US Senate races in Texas, North Carolina, South Carolina, Ohio – states where Trump campaigned hard, urging voters to pretend that he was on the ballot.

Trump told the New York Times that he was prepared to work with Democrats.

“We’ll work with the Democrats, and we’ll, you know, look forward to working with them. We’ll probably work something out,” the President said, days after claiming that he would run the administration over the next two years using his veto powers.

Trump blamed Republican losses on the fact that he was not on the ballot and said he had no regrets about endorsing candidates such as Senator Darline Graham, Republican of South Carolina, and Ken Paxton, the Republican attorney general of Texas.

“I wasn’t on the Ballot and if I was, we would have won IN A LANDSLIDE! Thank you for your attention to this matter,” Trump posted on Truth Social.

(Report by Sagar Kulkarni/PTI)— Press Trust of India (@PTI_News) November 4, 2026

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील कामगिरीवरील जनमताचा कौल
या निवडणुकीकडे ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील कामगिरीवरील जनमताचा कौल म्हणून पाहिले जात होते. महागाई, इंधन आणि दैनंदिन वस्तूंच्या वाढलेल्या किमती, इराणमधील युद्ध आणि सरकारी भ्रष्टाचाराबाबतच्या चिंता हे मतदारांसाठी महत्त्वाचे मुद्दे ठरल्याचे एपीच्या मतदार सर्वेक्षणातून समोर आले आहे.

अनेक मतदारांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली होती. ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या धोरणांवरही प्रश्न उपस्थित झाले. या असंतोषाचा फायदा डेमोक्रॅटिक पक्षाला झाल्याचे निवडणूक निकालांवरून दिसून येत आहे.

आम्ही डेमोक्रॅटसोबत काम करु
निवडणुकीच्या निकालानंतर डेमोक्रॅटिक पक्षासोबत सहकार्य करणार का, याबाबत विचारलं असता ट्रम्प यांनी सकारात्मक उत्तर दिलं. “आम्ही डेमोक्रॅट्ससोबत काम करू. त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्ही बहुधा काहीतरी मार्ग काढू”, असे ट्रम्प यांनी म्हटल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.

तसंच डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाला बसलेल्या मोठ्या पराभवावर प्रतिक्रिया देताना डेमोक्रॅटिक पक्षाचं अभिनंदन केलं आहे. ‘डेमोक्रॅट्सनी चांगली कामगिरी केली’, अशी कबुली ट्रम्प यांनी दिली.

“आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे या निकालामुळे मला थोडं आश्चर्य वाटलं”, असं ट्रम्प म्हणाले. दरम्यान, पराभवानंतर ट्रम्प यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतली. काँग्रेसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षासोबत काम करण्यासाठी अनेक मुद्दे असल्याचं त्यांनी नमूद केलं. दोन्ही पक्ष एकत्रितपणे अनेक विषयांवर काम करू शकतात, असंही त्यांनी सूचित केलं. तसंच, मध्यावधी निवडणुकीतील निकालांचा परिणाम म्हणून आपल्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल करण्याचा विचार नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

Nashik MC News : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांचा आज फैसला; ठाकरे सेनेची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिकेतील (Municipal Corporation) १० स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्तीची प्रक्रिया आज (बुधवार ४ नोव्हेंबर) रोजी दुपारी १२ ते ३ या...