Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमवैजापूर पोलिसांची गांजा तस्करावर कारवाई

वैजापूर पोलिसांची गांजा तस्करावर कारवाई

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील शिऊर बंगला (Shiur Bangala) येथे एका वाहनासह गांज्या तस्करास (Cannabis Smuggler) शिऊर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चौदा लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना मंगळवारी दि. 10 रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विकादास आमरदास (वय 27) रा. फेस नं 5 विजय गार्डन जमशतपूर बिराज नगर छोटा गोविंद झारखंड (Jharkhand) असे गांज्याची (Cannabis Smuggler) वाहतूक करणार्‍या व्यकीचे नाव आहे. शिऊर पोलीसांची रात्रीच्या गस्तीवर आसलेले वाहन चालक सुभाष ठोके यांना पाच वाजेच्या सुमारास शिऊर बंगल्या जवळ संशयितरित्या एक वाहन थांबलेले दिसल्याने वाहनांमध्ये काय आहे, असे विचारून चौकशी केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केली असता या वाहनांमध्ये गांज्या सदृश पदार्थ दिसून आला.

वाहनासह चालकाला शिऊर पोलीस ठाण्यात (Shiur Police Station) आणून दोन शासकीय कर्मचारी आसलेल्या पंचासमक्ष पंचनामा केला आसता सदरील वाहनात 39.590 किलो ग्रॅम वजनाचा गांजा सुमारे तीन लाख 95 हजार नऊशे रूपये किंमतीचा तसेच एक इनोव्हा कार (क्र.जे.एच. 05 ए.एल. 7668), दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकुण चौदा लाख पाच हजार नऊशे रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करून आरोपीविरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले, सुभाष ठोके, राहूल थोरात, सविता वरपे, किशोर आघाडे, विशाल पैठणकर यांनी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या