Friday, May 3, 2024
Homeनगरधमक्यांचं सत्र सुरूच; वैजापूरच्या आमदारांना निनावी पत्र

धमक्यांचं सत्र सुरूच; वैजापूरच्या आमदारांना निनावी पत्र

वैजापूर (प्रतिनिधी)

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश बोरनारे यांना धमकीचं पत्र आलंय. या पत्राविषयी आमदारांनी सविस्तर सांगितलं. ते म्हणाले, मला धमकीचे पत्र चार दिवसांपूर्वी आले आहे. अहमदनगरहून पोस्टाने हे पत्र आले आहे. या पत्रात चार ओळींचा संदेश आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक तुम्हाला जीवे मारणार आहेत, असा मजकूर त्यात आहे. तसेच एका महिलेने हे पत्र पाठवलं असल्याचं बोरनारे यांनी सांगितलंय.

- Advertisement -

आमदार रमेश बोरनारे यांना ही धमकी कोणत्या कारणासाठी आली आहे, त्यांचा कुणाशी वाद झाला होता का, काही पूर्ववैमनस्य उफाळून आले आहे का, याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत. वैजापूर पोलीस ठाण्यात आमदार बोरनारे यांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. यामागे फक्त राजकारण आहे, असा माझा अंदाज आहे.

मुलाच्या आजारपणाला कंटाळला, बापाने उचलले टोकाचे पाऊल…जे केलं तेही हैराण करणारे…

माझा वैयक्तिक कुठलाही वाद नाही. राजकीय हेतूने ही मला धमकी देण्यात आली आहे, या पत्राची चौकशी झाली पाहिजे. अहमदनगरहून टपालाने मला हे पत्र आलंय. मी याबाबत पालकमंत्री संदीपान भुमरे यांना बोललो आहे. दोन दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटून कल्पना देणार आहे, अशी माहितीही रमेश बोरनारे यांनी दिली आहे.

धक्कादायक! डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट; १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना धमकीचे संदेश आले आहेत. अगदी मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आला होता. पोलीस कंट्रोल रुममध्ये हा कॉल आला होता. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. मात्र सदर आरोपी दारुच्या नशेत होता.

अंगात पोलिसाचा गणवेश, पायात लाल शूज; फुकटेगिरी करणारा तोतया पोलीस गजाआड

तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कर्नाटकातल्या जेलमधून जयेश पुजारी या आरोपीने धमकी दिल्याचं उघड झालंय. पुजारी हा सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या