Friday, May 3, 2024
Homeनगरवांबोरी चारीचे पाणी प्रत्येक तलावात पोहोचवणार - खा. डॉ. विखे

वांबोरी चारीचे पाणी प्रत्येक तलावात पोहोचवणार – खा. डॉ. विखे

करंजी |प्रतिनिधी| Karanji

वांबोरी चारी पाणी योजनेचे वीज बील 18 कोटी रूपये थकले आहे, तर मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेची पाणीपट्टी साडेपाच कोटी रूपये थकली आहे, असे असताना देखील राज्यात आपले सरकार असल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याची देखील योजना सुरळीतपणे सुरू ठेवण्याचे काम केले आहे. लाभ क्षेत्रातील प्रत्येक तलावात पाणी पोहोचवणार यासाठी लाभ धारक शेतकर्‍यांचे देखील सहकार्य करावे, असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र लोहसर येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामासह वांबोरी चारी पाणी योजनेच्या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, संतोष महाराज गीते, माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, मिर्झा मणियार, जि.प.सदस्य पुरुषोत्तम आठरे, प़ं.स सदस्य सुनील परदेशी, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे, अरूण रायकर, जिजाबापू लोंढे, चेअरमन चारूदत्त वाघ, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम वारे, गटविकास अधिकारी जगदीश पालवे, सरपंच अनिल गीते, माजी सरपंच सुरेश चव्हाण व 39 गावातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

जल जीवन मिशन योजना व वांबोरी चारीचे पाणी यासंदर्भात अधिकारी व लाभधारक शेतकरी यांच्याशी थेट संवाद साधत माजी मंत्री कर्डिले यांनी मार्गदर्शन केले. तसेच या योजनेचे काम पारदर्शकपणे करावे असे आवाहन त्यांनी केले. अनेक गावांच्या रस्त्यांची पुरती वाट लागली असून अनेक ठिकाणी या योजनेचे काम निकृष्ट झाले असल्याच्या तक्रारीचा पाढा विविध गावच्या पदाधिकार्‍यांनी वाचला.

टप्पा दोनचे पुढच्या महिन्यात टेंडर

करंजी गावासह इतर 14 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाचे टेंडर पुढील नोव्हेंबर महिन्यात काढण्यात येणार असून लवकरच टप्पा दोनच्या कामाला देखील सुरूवात केली जाणार असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या