Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याचिंचवड पोटनिवडणुकीत मविआची धाकधूक वाढली; वंचितचा 'या' उमेदवाराला पाठिंबा

चिंचवड पोटनिवडणुकीत मविआची धाकधूक वाढली; वंचितचा ‘या’ उमेदवाराला पाठिंबा

पुणे | Pune

पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Pimpri-Chinchwad assembly by-Election) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) डोकेदुखी वाढली असून ठाकरे गटासोबत युती केलेल्या वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत अधिक रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे…

- Advertisement -

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी : आता शिर्डीत होणार नाईट लँडिंग

वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पक्षांचे परिपत्रक जारी करत राहुल कलाटेंना निवडून आणण्यासाठी मतदारांना आवाहन केले आहे. याशिवाय चिंचवडमध्ये भाजपला (BJP) केवळ कलाटेच थांबवू शकतात असा वंचितला विश्वास आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मोठी बातमी! राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

तसेच पिंपरी चिंचवडमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे (Rahul Kalate) हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता.‌ त्यावेळी त्यांना १ लाख १२ हजार मते मिळाली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे (Shivsena) सभागृह नेते आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. मात्र तसे घडले नाही,असे वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

बाजार समितीतून ट्रॅक्टर चोरी झाल्याने शेतकऱ्यांचा रास्ता रोको

- Advertisment -

ताज्या बातम्या