Friday, May 3, 2024
Homeनाशिकपार्किंगच्या वादातून गाड्यांची तोडफोड

पार्किंगच्या वादातून गाड्यांची तोडफोड

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

जेलरोड परिसरातील (Jail Road Area) नारायण बापू नगर येथे आज पहाटे पार्किंगच्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने चारचाकी गाड्यांची तोडफोड केली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे…

- Advertisement -

या प्रकारामुळे जेलरोड परिसरातील नारायण बापू नगरमध्ये घबराट निर्माण झाली असून संबंधित टोळक्याने (Gang) दहशत निर्माण व्हावी म्हणून गाड्यांची तोडफोड केली असल्याचे समजते. तर गाड्यांची तोडफोड झाल्याचे समजताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले व त्यांनी संबंधित आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली.

दरम्यान, या घटनेप्रकरणी उपनगर पोलिसांनी चार जणांना अटक (Arrested) केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर (Nilesh Mainkar) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या