नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भोपाळहून (Bhopal) दिल्लीला (Delhi) जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) आग लागल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीना शहराजवळ पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या आग लागल्याचे कळताच लोको पायलटने तातडीने ट्रेन थांबवून ट्रेनमधून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यामुळे सुदैवाने मोठी हानी टळली असून अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. त्यामुळे सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणत्याही दुखापतीची नोंद नाही.
मध्य प्रदेशमधील रानी कमलापती (पूर्वीचे हबीबगंज) स्थानकातून (Rani Kamalapati Station) ही ट्रेन दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना झाल्यानंतर काही वेळाने हा प्रकार घडला.बॅटरी बॉक्सला आग लागल्याची बाब कुरवाई केथोरा स्थानकाजवळ निदर्शनास आली. यानंतर तातडीने ट्रेन थांबवून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
ट्रेनमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढून आग विझवण्याचं काम हाती घेण्यात आले. “वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग आटोक्यात आणण्यात आली”, अशी माहिती रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
Trimbakeshwar News : दुगारवाडी धबधब्यात पर्यटक गेला वाहून; शोधमोहीम सुरू
दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते देशातल्या विविध भागात हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. देशात वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्यापासून अनेक वेळा ही चर्चेत आली आहे. वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक असो, वन्य प्राणी वा इतर पाळीव जनावरे ट्रॅकवर आल्यामुळे झालेल्या अपघातात काही ट्रेनच्या पुढच्या भागाचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहे.