गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi
नेवासा (Newasa) तालुक्यातील मोरयाचिंचोरे लगत असलेल्या वांजोळी (Vanjoli) येथील दानी वस्तीवर सशस्त्र दरोडा (Robbery) पडल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस (Police) सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार शांताराम विठ्ठल दानी (वय 55) रा. मोरयाचिंचोरे लगत वांजोळी यांचे वस्तीवर दि. 16 रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास हातात तलवारी व चाकू असलेल्या चौघा अनोळखी इसमांनी घरात प्रवेश करत घरातील सामानांची उचकापाचक केली. तलवार व चाकूने दानी कुटुंबातील पती-पत्नीस मारहाण (Beating) करत छाया दानी यांचे गळ्यातील 30,000 किंमतीचे मंगळसूत्र, अरुणा दानी यांचे गळ्यातील 30,000 रुपये किंमतीचे गळ्यातील मंगळसूत्र, तसेच 12,000 रुपये किंमतीचे कानातील झुंबर, 5000 रुपये किंमतीचा मोबाईल व मुलगा कृष्णा दानी याला चाकू गळ्याला लावत त्याचे गळ्यात असला 3000 रुपयांचा सोन्याचा पत्ता देखील या दरोडेखोरांनी हिसकावून घेतला. असा एकूण 80,000 रुपयांच ममुद्देमाल घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. या घटनेत फिर्यादी व पत्नी छाया हे गंभीर जखमी (Injured) झाले.
घटनेची माहिती करताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी आपल्या सहाकार्यांसोबत घटनास्थळी भेट देत पहाणी केली व पुढील तपासाकामी सुचना दिल्या. श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक संजय कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधीकारी सुनील पाटील तसेच सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी देखील घटनास्थळी भेट देत पहाणी केली व तपासाकामी आवश्यक त्या सुचना दिल्या.
या ठिकाणी ठसे तज्ञ तसेच श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले होते. शांताराम विठ्ठल दानी यांनी सोनई पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी वरुन अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा र नं. 40/2025 बीएनएसचे कलम 309(6), 3(5), भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे (Sonai Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी हे करत आहेत.