Friday, May 3, 2024
Homeनगरवारी, रवंदे सबस्टेशनची क्षमता वाढविण्यासाठी 1 कोटी 40 लाख मंजूर

वारी, रवंदे सबस्टेशनची क्षमता वाढविण्यासाठी 1 कोटी 40 लाख मंजूर

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्याच्या वारी (Vari) व रवंदे (Ravande) परिसरातील शेतकर्‍यांच्या विजेच्या (Electricity) बाबतीत असलेल्या अनेक समस्या मार्गी लागणार असून वारी (Vari) व रवंदे सबस्टेशनच्या (Ravande Sub Station) पॉवर रोहीत्रांची (Power Rohitra) क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांनी 1 कोटी 40 लाख रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे (Saibaba Sansthan President Ashutosh Kale) यांनी दिली आहे.

- Advertisement -

वारी (Vari) व रवंदे (Ravande) परिसरातील वीज ग्राहकांना वीज पुरवठा (Power supply) करणारे वारी व रवंदे सबस्टेशनचे पॉवर रोहीत्र 3.15 एम. व्ही.ए. क्षमतेचे होते. या भागाला वीजपुरवठा (Power supply) करणारे या सबस्टेशनचे (Sub Station) पॉवर रोहीत्र सातत्याने ओव्हरलोड होवून वीज पुरवठा खंडीत (Power outage) होता. त्याबाबत अनेक शेतकर्‍यांनी आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांच्या जनता दरबारात आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्याबाबत सविस्तर माहिती घेवून या दोनही सबस्टेशनच्या पॉवर रोहीत्रांची क्षमता वाढविणे गरजेचे होते. त्यासाठी ना. आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांच्याकडे या सबस्टेशनच्या पॉवर रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी पाठपुरावा केला.

ना. हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) हे शनिवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी ना. काळे यांनी वारी व रवंदे परिसरात वीज ग्राहकांना येत असलेल्या अडचणीकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून वारी व रवंदे सबस्टेशनच्या पॉवर रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी केली. या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या दोनही सबस्टेशनसाठी 1 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे वारी उपकेंद्राच्या माध्यमातून वारी, भोजडे, हनुमानवाडी (कान्हेगाव), डोणगाव शिवार व परिसर तसेच रवंदे उपकेंद्राच्या माध्यमातून मळेगाव थडी, रवंदा शिवार व परिसरातील वीज ग्राहकांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या