Monday, September 14, 2026
Homeक्राईमCrime News : वाहन चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Crime News : वाहन चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी || 7.60 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून वाहन चोरी करणार्‍या गुन्हेगाराला अटक करत त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून 7 लाख 60 हजार रूपयांची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
मंगल किशोर शिंदे (वय 34, रा. एल.टी. कॉलनी, एमआयडीसी) यांनी एमआयडीसी पोलिसांत सोमवारी (8 सप्टेंबर) फिर्याद दिली होती की, सोमवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली पिकअप ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

तपासदरम्यान सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली. मनमाड रस्ता, विळद बायपासजवळील डोंगराकडे चोरीच्या वाहनांसह संशयित आरोपी येणार असल्याचे समजल्यावर पोलिसांनी पथक तयार करून सापळा लावला. कारवाईदरम्यान संशयित आरोपी प्रणव नितीन पठारे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) व त्याचे दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी वाहनचोरीची कबुली दिली.

दरम्यान, त्यांच्या ताब्यातून एक पिकअप, एक जितो वाहन व विना नंबरची दुचाकी असा एकूण 7 लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई सहायक निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राकेश खेडकर, संदीप पवार, सचिन आडबल, राजु सुद्रीक, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, पोकॉ ज्ञानेश्वर आघाव यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Ganeshotsav 2026 : नऊ वर्षांनंतर १२ दिवसांचा गणेशोत्सव; हरतालिका, गणेश चतुर्थी...

0
नाशिक | Nashik विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची आतुरता आता शिगेला पोहोचली असून, नाशिक शहर गणेशोत्सवासाठी (Nashik City Ganeshotsav) सज्ज झाले आहे. सोमवारी (दि.१४) गणेशोत्सवाला सुरुवात होत...