Friday, October 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप; पुण्यातील डोणजे येथे...

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप; पुण्यातील डोणजे येथे अंत्यसंस्कार

चाहत्यांची मोठी गर्दी

पुणे |

- Advertisement -

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर २०२६) पहाटे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर पुणे जिल्ह्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री उदय सामंत, सिनेसृष्टीतील कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठा जनसमुदाय व उपस्थित होते.

गोव्यात घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर हे गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

गुरुवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव गोव्याहून पुण्यात आणण्याची व्यवस्था करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि चाहत्यांची गर्दी होऊ लागली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तसेच त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांच्याशी संवाद साधून कुटुंबीयांचे सांत्वन केले.तसेच आज रात्री पुणे येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

अभिनयाच्या एका पर्वाचा अस्त
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवादफेकीने, प्रभावी अभिनयाने आणि रोखठोक व्यक्तिमत्त्वाने नाना पाटेकर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केले.
‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील.विविध चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान
नाना पाटेकर यांनी केवळ अभिनय क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक कार्यातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने संवेदनशील भूमिका घेतली.

नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रभावी अभिनेता, तर महाराष्ट्राने सामाजिक प्रश्नांची जाण असलेले व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

ताज्या बातम्या

Jamkhed : कोयत्याच्या धाकाने घरावर दरोडा घालणारी टोळी जेरबंद

0
अहिल्यानगर/ जामखेड |प्रतिनिधी| Ahilyanagar | Jamkhed जामखेड तालुक्यातील जवळा येथे रात्री घरात घुसून चाकू व कोयत्याचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणार्‍या टोळीचा...