Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर नेमकं काय घडलं? विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणाले...

Video : त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर नेमकं काय घडलं? विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणाले…

नाशिक/ त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिराजवळून एक मिरवणूक जात असताना मिरवणुकीतील काही जणांनी मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवल्याने काही काळ तणाव वाढला होता.

- Advertisement -

मात्र सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळल्यावर तणाव निवळला. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिराची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी याविषयी अधिक माहिती विश्वस्थांकडून जाणून घेतली.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, १३ तारखेला पावणे १० वाजता काही लोक त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाला आले होते. त्यांना आत जाण्यापासून सुरक्षारक्षकांनी अडवले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्यानंतर त्यांनी पायरीपाशी थांबून धूप दाखवला आणि ते तिथून निघून गेले. पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून त्यानुसार पुढील बाबी निष्पन्न होतील, अशी माहिती बी जी शेखर पाटील यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या