Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMVA Seat Sharing : मविआचा जागावाटपाचा 'असा' आहे संभाव्य फॉर्म्युला; सपा, शेकापला...

MVA Seat Sharing : मविआचा जागावाटपाचा ‘असा’ आहे संभाव्य फॉर्म्युला; सपा, शेकापला किती जागा मिळणार?

मुंबई | Mumbai

राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) घोषणा होण्यास आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. यंदा राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti and Mahavikas Aagahdi) अशी थेट लढाई पाहायला मिळणार आहे. त्यात दोन्ही आघाड्यांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही. महाविकास आघाडीत जवळपास ८० टक्के जागावाटप निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. अशातच आता महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार? याबाबतची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : महायुतीकडून राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ७ नावांवर शिक्कामोर्तब; ‘यांना’ मिळाली संधी

मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत काँग्रेस (Congress) ११९, शिवसेना ठाकरे गट ८६ आणि शरद पवार गट (Sharad Pawar Group) ७५ जागा लढविणार असल्याचे बोलले जात आहे. तर शेकापला ३, समाजवादी पक्ष ३ आणि कम्युनिस्ट पक्षाला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १३ जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शरद पवार गटाने ८ आणि उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रवादीने ९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Assembly Elections 2024 : मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार; निवडणुक आयोगाची ३.३० वाजता पत्रकार परिषद

तसेच आतापर्यंत २२२ जागांवर एकमत झाले असून त्यात मुंबईतील (Mumbai) १३ जागा ठाकरे गटाला, ८ जागा काँग्रेस, १ समाजवादी पार्टीला देण्याबाबत सहमती झाली आहे. तर अद्याप मुंबईतील ४ जागांवर तिन्ही प्रमुख पक्षात रस्सीखेच आहे. त्यात संभाव्य जागांमध्ये उमेदवारांची (Candidate) अदलाबदली होण्याची शक्यता आहे. भाजपाविरोधात एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. याशिवाय अनेक मुस्लीम बहुल जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.

हे देखील वाचा : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार

दरम्यान, मविआत अद्याप १० ते १५ विधानसभा मतदारसंघांवरून तिढा कायम असल्याचे सांगितले जाते. मात्र, शरद पवार गट १० पैकी ८ जागा जिंकत स्ट्राईक रेटच्या गणितात सरस ठरला होता. तरीही शरद पवार गटाने विधानसभेच्या जागावाटपात सर्वात कमी म्हणजे ७५ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या