Wednesday, January 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजVikrant Massey: मोठी बातमी! बॉलिवुड अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनय क्षेत्रातून घेतला संन्यास;...

Vikrant Massey: मोठी बातमी! बॉलिवुड अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनय क्षेत्रातून घेतला संन्यास; सोशल मिडियावरील पोस्ट व्हायरल

मुंबई | Mumbai
आपल्या अष्टपैलू भुमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनय क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याने असा निर्णय घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याने सोशल मीडियावर अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली आहे. कारकिर्दीच्या शिखरावर असताना विक्रांतने हा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. निवृत्तीबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. नुकताच त्याचा ‘साबरमती रिपोर्ट्स’ हा चित्रपट रिलिज झाला आहे. यामध्ये त्याचा अभिनयाची चर्चा सर्वत्र पसरली आहे.

१ डिसेंबर रोजी विक्रांतने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेली काही वर्षे खूप चांगली गेली आहेत. तुमच्या अद्भुत पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे. पण जसजसा मी पुढे जात आहे तसतसे मला हे समजले आहे की, माझ्यासाठी स्वतःला एकत्र खेचून घरी परतण्याची वेळ आली आहे. एक पती, वडील आणि मुलगा… आणि अभिनेता म्हणूनही. विक्रांतने पुढे लिहिले – येत्या 2025 मध्ये, योग्य वेळ येईपर्यंत आम्ही एकमेकांना शेवटच्या वेळी भेटू. शेवटचे २ चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. सर्व काही आणि दरम्यान घडलेल्या सर्व गोष्टींसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. त्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी राहीन.

- Advertisement -

https://www.instagram.com/p/DDDPEs0zd9s

अभिनेता विक्रांत मेस्सीने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. आजवरच्या कारकिर्दीत विक्रांतने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच आपल्या भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच विक्रांतने द साबरमती रिपोर्टच्या प्रमोशनदरम्यान त्याला सतावणाऱ्या चिंतेबद्दल जाहीरपणे बोलला होता. त्याचा ९ महिन्याचा मुलगा वर्धनच्या सुरक्षेसंदर्भात त्याने चिंता व्यक्त केली होती. साबरमती रिपोर्ट हा २००२च्या गोध्रा ट्रेन अग्निकांडवर आधारित आहे. ज्यामुळे हा चित्रपट वादात सापडला होता. विक्रांतने एका मुलाखतीत म्हटले होते की, सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर त्याला धमक्या मिळत होत्या. इतकेच नव्हे तर त्याच्या नवजात मुलावरही निशाणा साधला होता.

मालिकांपासून करिअरला सुरवात
विक्रांत मेस्सीने त्याचा प्रवास हो छोट्या पडद्यापासून सुरु केला. त्याने धरम वीर, बालिका वधू, कुबूल है यांसारख्या मालिकांपासून काम केले. त्याने टीव्हीवर खूप नाव कमावले आणि त्याच्या चाहत्यांची मनेही जिंकली. छोट्या पडद्यावर आपली छाप सोडल्यानंतर त्याने बॉलिवुडमध्ये एन्ट्री केली. विक्रांतला १२वी फेल या चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली. त्याचा हा चित्रपट खूप गाजला. यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट केले. नुकताच विक्रांतच्या ‘साबरमती रिपोर्ट’ ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या