Friday, May 3, 2024
Homeनगरशासन नियमांचे उल्लंघन करणारी तीन दुकाने केली सिल

शासन नियमांचे उल्लंघन करणारी तीन दुकाने केली सिल

सोनई |वार्ताहर| Sonai

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी मंगळवारी सकाळी अचानक सोनई गावाला भेट देवून बसस्थानक परीसरात शासन नियमांचे उल्लंघन दिसताच तीन दुकाने एक महिन्यासाठी सील करण्याचा आदेश दिला.

- Advertisement -

सकाळी घोडेगाव येथून राहुरीला जात असताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले सोनईतील आंबेडकर चौकात मोटारीतून उतरले व पायी चालत त्यांनी पाहणी सुरु केली. अर्बन बँकेसमोरील इलेक्ट्रॉनिक दुकानात जावून त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुकान सील करण्याचा आदेश दिला. यानंतर गावात एकच धावपळ उडाली. बरोबर असलेल्या पथकाने रवींद्र मच्छिंद्र गोसावी व योगेश ज्ञानदेव कोरडे यांना प्रत्येकी एक हजाराचा दंड केला.

बसस्थानक परीसरात असेलेल्या विकास सोन्याबापू बोरुडे यांचे स्प्रे पंप शॉप, विनायक मोरे यांची मोबाईल शॉपी व निखील दहातोंडे यांचे इलेक्ट्रॉनिक दुकान ही तीन दुकाने पोलीस व महसूल विभागाने एक महिन्यासाठी सील केली. यावेळी सोनईचे पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे पथक उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुरीला रवाना झाल्यानंतरही दिवसभर सर्व दुकानदार नियमांचे पालन करताना दिसले.

- Advertisment -

ताज्या बातम्या