Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यासोशल मीडियात व्हायरल झालेल्या क्लीपमधील आवाज माझा नाही; आरोग्यमंत्र्यांचे ट्विट

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या क्लीपमधील आवाज माझा नाही; आरोग्यमंत्र्यांचे ट्विट

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाने एक ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. समाजमाध्यमांत व्हायरल झालेल्या या क्लीपनंतर करोनाची दुसरी लाट येते की काय असे वाटत होते. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या ऑडीओवर अखेर स्वत: राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले असून त्यांनी ही क्लीप खोटी असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे…

- Advertisement -

या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे की, राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती आहे. मंगल कार्यालयांवर छापा टाकून विनामास्क उपस्थित असलेल्या नागरिकांवर, जास्त संख्येने नागरिक उपस्थित असल्यास त्या मंगल कार्यालयाला नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

दुसऱ्यांदा असे घडल्यास त्या मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करुन 15 दिवसांसाठी मंगल कार्यालय सील करावे. कोचिंग क्लासेसमध्येही छापा टाकून तिथे मास्क, सॅनिटायझर याची व्यवस्था असल्याची खात्री करावी अन्यथा क्लास चालकांवरही गुन्हे दाखल करुन क्लास 15 दिवसांसाठी सील करावेत, त्याचबरोबर खासगी रुग्णालयांत अनेक सर्दी, खोकला, ताप असणारे रुग्ण जातात. मात्र डॉक्टर त्यांना कोविडची तपासणी न करता औषधे देऊन पाठवून देतात. त्यांनाही याबाबत समज द्यावी.

रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. भाजी मंडई, दुकानदार यांचे दुसऱ्यांदा टेस्टींग करावे, कोरोनाबाधीत रुग्ण आढळलेल्या ठिकाणी मायक्रो सिलिंग चालू करावे अशा सूचना या क्लिपमध्ये करण्यात आल्या आहेत.

मात्र या क्लिपमधील आवाज आपला नसून पूर्णपणे खोटा असल्याचे टोपे म्हणाले. ते म्हणतात, अशी कोणतीही क्लिप आपण प्रसिद्ध केली नसून लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.

- Advertisment -

ताज्या बातम्या