Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकला गिधाड संवर्धन-पैदास केंद्र

नाशिकला गिधाड संवर्धन-पैदास केंद्र

नाशिक | खंडू जगताप Nashik

दुर्मिळ होत चालेल्या गिधाडांचे संरक्षण, संवर्धन व पैदास करून नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी केंद्र शासनाने देशात पाच संवर्धन व पैदास केंद्रांना मंजुरी दिली आहे. यामध्ये नाशिकच्या केंद्रास मंजुरी मिळाली असल्याने नाशिकच्या अंजनेरी, त्र्यंबकेश्‍वर व परिसरात आढळणार्‍या गिधाडांच्या संवर्धनसाठी याचा मोठा लाभ होणार आहे.

- Advertisement -

पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या गिधाडांच्या संवर्धन आणि विकासाकरिता केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पंचवार्षिक कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार नाशिकसह पाच संवर्धन-पैदास केंद्रांची उभारणी, व्हल्चर सेफ झोन आदी कऱण्यात उरणार आहेत. याकामांसाठी ४०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

९० च्या दशकानंतर देशभरात गिधाडांची संख्या झपाट्याने कमी झाली. यास वाढती विकासकामे, प्रदूषण आणि डायक्लोफिनॅक औषध (जनावरांना दिले जात होते.) ही तीन प्रमुख कारणे आहेत. तथापि, निसर्गाचा घटक, अन्नसाखळीमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या गिधाडांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ११८ पानांचा पंचवार्षिक कृती आराखडा तयार केला आहे.

देशातील संवर्धन पैदास कार्यक्रमात वाढ करण्यात आली असून नवीन पाच केंद्रे मंजूर करण्यात आली असून एक नाशिक येथे मंजूर करण्यात आले आहे. नाशिकच्या अंजनेरी, त्र्यंबकेश्‍वर, ब्रह्मगिरी, मेटघर किल्ला, वाघेरा घाट, खोरीपाडा अशा परिसरात पांढर्‍या पाठिच्या गिधाडांचे अस्तित्व आहे. या भागातील डोंगर कपारी तसेच झाडांवर त्यांची मोठ्या प्रमाणात घर्टी आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी नाशिक वन विभागासह नेचर कंन्झरवेशन सोसायटी, पर्यावण प्रेमी व पक्षी प्रेमी यांनी प्रयत्न केले आहेत. दोन ठिकाणी गिधाड रिसॉर्ट सुरू करण्यात आली असून मृत जनावरे या भागात आणुन गिधाडांना भक्ष दिले जात आहे.

केंद्र शासनाने तयार कलेल्या कृती आराखड्यात नाशिकला स्थान मिळाले असून आता गिधाडांचे संवर्धनासाठी मोठा लाभ होणार असल्याचे पक्षीप्रेमींकडून सांगीतले जात आहे.

देशात या पाच ठिकाणी होणार केंद्र

नाशिक (महाराष्ट्र), गोरखपूर (मध्यप्रदेश), त्रिपुरा, रामनगर (कनार्टक), कोइंबतूर (तामिळनाडू) या पाच ठिकाणी या केंद्रांना मजुरी देण्यात आली आहे. यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. चार व्हल्चर रेस्क्यू सेंटर उभारले जाणार असून ते पिंजोर, भोपाळ, गुवाहटी, हैदराबाद येथे होणार आहेत. नॅशनल व्हल्चर रिकव्हरी कमिटी अंतर्गत या आराखड्याची अंमलबजावणी होणार आहे. याअंतर्गत राष्ट्रीय, राज्यस्तरीय समित्या स्थापन करून आराखडा संबंधित विविध यंत्रणांमार्फत राबविला जाणार आहे.

अशा आहेत जाती

जगभरात गिधाडांच्या २३ प्रजाती आढळतात. पैकी भारतात बीअर्डेड व्हल्चर, सीनरस व्हल्चर, इजिप्शीअन, युरेशियन, हिमालयीन, लांग बिल्ड, रेड हेडेड, स्लेंडर बिल्ड, ओरिएंटेल व्हाईट बॅक या ९ प्रजाती आढळतात. पैकी लॉंग बिल्ड व्हल्चर, स्लेंडर बिल्ड व्हल्चर व ओरिएंटेल व्हाईट बॅक व्हल्चर या तीनच प्रजातींची गिधाडे दिसून येतात. उर्वरित ६ प्रजाती जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. नाशकात ओरिएंटेल व्हाईट बॅक व्हल्चर गिधाडांचे प्रमाण अधिक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या