Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशमोदींसाठी आले ८४०० कोटींचे विशेष विमान? काय आहेत त्यात जाणून घ्या

मोदींसाठी आले ८४०० कोटींचे विशेष विमान? काय आहेत त्यात जाणून घ्या

नवी दिल्ली

पंतप्रधान, राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीसाठी एअर इंडिया वन हे (बोइंग 777) विशेष विमान अमेरिकेतून भारतात दाखल झाले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी वापरले जाणारे एअर फोर्स वनच्या धर्तीवर दोन विमाने भारताने अमेरिकेकडून घेतले आहे. ८४०० कोटी रुपयांच्या या विमानात अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान, राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या शासकीय दौऱ्यासाठी हे विमान वापरले जाणार आहेत.

भारताने अमेरिकेकडून दोन B777 विमानांचा करार केला. त्यातील एक विमान मिळाले.काय आहे या विमानातील विशेषता…

१)या विमानात एयरक्राफ्ट एडवांस डिफेंस सिस्टम प्रणाली आहे. यामुळे क्षेपणास्त्राचाही यावर परिणाम होणार नाही.

२) एकावेळेस इंधन भरल्यावर १७ तास हे विमान हवेत उड्डान करु शकते. यामुळे भारत-अमेरिकेतील १२ हजार किमी अंतर एकाच टप्प्यात पार करु शकते.

३) विमानात एक मेडिकल सेंटर आहे. तसेच व्हिव्हिआयपीसाठी दोन कँबिन आहेत.

४) दोन्ही विमानांची किंमत ८,४५८ कोटी आहे. एका तासाच्या विमानाच्या उड्डानासाठी १ कोटी ३० लाखांचा खर्च येतो.

५) हे विमान एका तासात ९०० किमी पर्यंत वेग घेऊ शकते. एअर फोर्सच्या पायलेटचे प्रशिक्षण पुर्ण होत नाही तो पर्यंत एअर इंडियाचे पायलेटच हे विमान चालवतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या