Monday, April 28, 2025
Homeनगरबसने अचानक ब्रेक दाबल्याने अनेक वाहने धडकली

बसने अचानक ब्रेक दाबल्याने अनेक वाहने धडकली

वडाळा महादेव |वार्ताहर| Wadala Mahadev

श्रीरामपूर-नेवासा रोड वरील वडाळा महादेव परिसरातील तैय्यबजी फार्म हाऊस येथे काल सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास विचित्र अपघात झाला. यामध्ये दोनजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. श्रीरामपूर आगारातील बस (क्र.एमएच 07 सी 9138) ही प्रवाशांना घेऊन श्रीरामपूरच्या दिशेने येत असताना अचानक एक व्यक्ती आडवा आल्याने बस चालकाने प्रसंगावधान राखत बस उभी केली.

- Advertisement -

यावेळी सदरचा इसम बचावला. मात्र, पंधरा ते वीस फूट अंतरावरील दुचाकी (क्र.एमएच 17 सीजे 7118) वर पिक अप (एमएच 17 सीव्हि 2868) पाठीमागून दुचाकी वाहनावर धडकल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. तर पिकअपच्या पाठीमागून येणारी दुचाकी (एमएच 17 एस 7185) ही पिकपला पाठीमागून धडकली. यामध्ये सदर व्यक्ती जखमी झाला. उपस्थित नागरिकांनी घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना कळवली.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कांबळे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत करत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले.

वडाळा महादेव परिसरात वारंवार विचित्र अपघात होत असून याठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी येथे वीज वितरण कर्मचार्‍यांचा अपघातात मृत्यू झाला होता. तसेच ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू झाला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Central Government Decision : केंद्र सरकारचा पाकिस्तानला दणका; १६ यूट्यूब चॅनेलवर...

0
नवी दिल्ली | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताकडून (India) पाकिस्तान विरूद्ध विविध स्तरांवर कारवाई सुरू आहेत. अशातच आता भारत सरकारच्या गृह...