Sunday, May 5, 2024
Homeनाशिकप्रभाग 30 : रस्ते, पाणी, आरोग्य प्रश्न गंभीर

प्रभाग 30 : रस्ते, पाणी, आरोग्य प्रश्न गंभीर

जुने नाशिक । प्रतिनिधी Old Nashik

प्रभाग क्रमांक 30 Ward 30 मध्ये पाहिजे, त्याप्रमाणे विकास न झाल्याची तक्रार नागरिक करतात. वडाळागांवसह Vadalagaon काही भागात पाणी प्रश्न गंभीर आहे. प्रभागात आरोग्य, अस्वच्छता, बंद पथदीप आदींच्या तक्रारी कायम आहे. नवीन वस्ती झालेल्या ठिकाणी मनपाकडून मूलभूत सुविधादेखील मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहे.

- Advertisement -

जवळपास संपूर्ण वडाळागाव, इंदिरानगर परिसर, जॉगिंग ट्रॅक परिसर, म्हाडा कॉलनी, साठेनगर, सादीक नगर आदी परिसर मनपाच्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये सामील आहे. सध्या पूर्व विभाग सभापतीपद या प्रभागाला मिळाले असले तरी प्रभागातील नागरीच मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे दिसत आहे.

निवडून आल्यापासून प्रभागातील नगरसेवकांचे कामांकडे लक्ष नाही, नागरिक तक्रारी करतात तरी त्याची दखल घेण्यात येत नाही. पाण्याची पाईपलाईन आली असली तरी त्या एक ठिकाणी रोखण्यात आले आहे. प्रभागातील महेबुब नगर, गुलशन नगर, मुमताज नगर, कादरी नगर आदी भागात रस्ते झालेच नाही. विद्युत पुरवठादेखील नाही. सर्वत्र कचर्‍याचे ढीग पडून राहते. घंटागाड्यांची संख्या अत्यंत कमी असून नियमित येत नाही.

– इरफान शेख

वडाळागाव व परिसरात गरीब, मध्यमवर्गीय लोकांची वस्ती जास्त आहे. म्हणून मनपाच्या वतीने भव्य हॉल तयार करावे, महिलांसाठी प्रशस्त व आधुनिक हॉस्पिटल तयार करावा. प्रसूतीसाठी महिलांना दूर जावे लागते. रात्रीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागतो. मनपा शाळांचा दर्जा चांगला करून ऊर्दू शाळेला अधिक खोल्या देऊन शिक्षक भरती करण्यात यावी, नियमित वीजपुरवठा ठेवण्यात यावा, अधूनमधून गढूळ पाणीपुरवठा होतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असून स्वच्छ पाणी मिळावे.

– नईम शेख

मदिना नगर, मदिना मशिद परिसरातील रस्त्यांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी सुमारे 3 ते 5 फुटांपर्यंत चिखल असतो. यामुळे पायी चालणेदेखील कठीण होते.

सादिक नगर, गरीब नवाज मशीद परिसर, मदार नगर, अण्णा भाऊ साठे नगर परिसर, म्हाडा कॉलनी आदी भागात पाणीप्रश्न गंभीर आहे. नळ असूनही पाणी येत नाही. काही भागात पाणी असले तरी दाब अगदी कमी असतो.

चार्वाक चौक परिसरात अस्वच्छता असते. मुख्य रस्त्यांवरील कचर्‍याची नियमित उचल होत नाही.

प्रभागात अनेक ठिकाणी पथदीप बंद असतात. यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांसह पायी चालणार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे लहान मोठ्या चोर्‍यादेखील वाढल्या आहेत.

वडाळागाव मुख्य चौकात गोठ्यातील घाण थेट रस्त्यावर आली आहे. त्याचे नियोजन करण्यात यावे.

केबीएच शाळेसमोरचा मुख्य मार्ग मागील अनेक महिन्यांपासून खोदून ठेवला आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे.

नवीन वडाळागाव भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत भंगार गोदाम असून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचा आरोप नागरिक करतात. यामुळे सतत वीजपुरवठा खंडित होते. याचा त्रास नियमित वीजबिल भरणार्‍यांनाही होतो.

अनधिकृत भंगार गोदामांमध्ये आग लागण्याचे प्रकार सतत घडत असते, तरी प्रशासन कठोर कारवाई करीत नाही. याठिकाणी कारवाई करून दोषींना शासन व्हावे, अशी मागणी नागरिक करतात.

मदिना नगर, मुल्ला कॉलनी आदी नवीन वस्ती भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत रो-बंगले, घरे व इमारती उभ्या झालेल्या आहे. त्याचप्रमाणे कच्चा लेआऊट करून जमीन विक्रीचा धंदादेखील जोरदारपणे चालू आहे. यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. मनपाचे अधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.

म्हाडा कॉलनी समोर मोठी कारवाई होऊन शेकडो अतिक्रमित झोपड्या मनपाकडून काढण्यात आले होते, मात्र हळूहळू त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या