Friday, May 3, 2024
Homeनगरपाणी योजना कामासाठी एकी ठेवून साथ द्या - ना. गडाख

पाणी योजना कामासाठी एकी ठेवून साथ द्या – ना. गडाख

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

मोठ्या प्रयत्नाने पाणी योजनांसाठी निधी मंजूर केला आहे. पाणी योजना अंमलबजावणीच्या कामात ग्रामस्थांनी एकी ठेऊन साथ द्यावी असे आवाहन नेवासा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

- Advertisement -

भेंडा-कुकाणा व घोगरगावसह 17 गावांच्या पाणी योजनेच्या दुरुस्ती व वाढीव कामासाठी जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत 28 कोटी 46 लाखांचा निधी नेवासा तालुक्यासाठी मिळाला आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, कुकाणा, चिलेखनवाडी, अंतरवली, तरवडी या 6 गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 12 कोटी 4 लाख तसेच बेलपिंपळगाव, घोगरगाव, बेलपांढरी, जैनपूर, गोधेगाव, भालगाव, बोरगाव, उस्थळ खालसा, सुरेगाव गंगा, बहिरवाडी, धामोरी यांसाठी 16 कोटी 42 लक्ष रुपये मंजूर केला आहे. ना शंकरराव गडाख यांनी व्यक्तिगत लक्ष घालून विशेष बाब म्हणून नेवासा तालुक्यातील पाणी योजनांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल भेंडा, कुकाणा, घोगरगाव पाणी योजना लाभधारक ग्रामस्थांच्या वतीने ना. शंकरराव गडाख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या पाणीयोजनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या