नाशिक । प्रतिनिधी Nashik
- Advertisement -
अल-निनोमुळे राज्यात पावसाला झालेला उशीर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा मोठा निर्णय घेतला आहे.नाशिकमध्ये जून आणि जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीकपात केली जाणार आहे.
महापालिकेने जून आणि जुलै या दोन महिन्यांसाठी सध्या तरी आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये दर शनिवारी पाणीकपात केली जाणार आहे. तसेच अल-निनोचा प्रभाव कायम राहिल्यास ऑगस्टमध्ये दोन दिवसाआड पाणी पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे
महापालिकेनुसार उपलब्ध पाणीसाठा केवळ ६० दिवस पुरेल इतकाच शिल्लक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




