Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्या'जलजीवन' धोरणांतर्गत होणार नळजोडणी

‘जलजीवन’ धोरणांतर्गत होणार नळजोडणी

नाशिक । प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या जलजीवन धोरणांतर्गत नळजोडणी होणार असून नाशिक जिल्ह्यातीलव पाच लाखांहून अधिक कुटुबांना नळाद्वारे थेट घरापर्यंत पाणी मिळणार आहे. प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जलजीवन धोरणही आखण्यात आले आहे. सन 2024 पर्यंत तब्बल 5 लाख 5 हजार कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यावर काम केले जात आहे.

- Advertisement -

एका सर्वेक्षणानूसार जिल्ह्यातील 5 लाख 5 हजार कुटुंबांच्या घरी नळ कनेक्शन नाही त्यांना विहीरी, बोअरवेल, नदी या जलस्त्रोताहून पाणी भरावे लागते.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1 लाख 20 हजार कुटुंबाना नळाद्वारे पाणी देण्यात येत आहे. पण घरात नळ नसलेल्या परिवारांची संख्या मोठी असून दुषित पाण्यामुळे साथीचे रोग मोठया प्रमाणात पसरत आहे. याचीच दखल घेत केंद्र शासनाच्या जलजीवन धोरणांतर्गत आता या कुटुंबाना नळ कनेक्शन देण्यासाठी नियोजन केले जात आहे.

त्यानुसार सध्याच्या जलस्त्रोतांतील उपलब्ध पाणी, त्यावरील अवलंबित्व याचा अभ्यास करण्यासह उर्वरित कुटुंबाना कसे पाणी देता येईल. त्यांच्यासाठी नव्याने पाणी पुरवठा योजना तयार करणे, नवीन जलस्त्रोत शोधणे, जीएसडीएच्या माध्यमातून भुजलाचा अंदाज घेत त्यानुसार पाण्याची उपलब्धी करणे. अशी सर्वच कामे केली जाणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठकही झाली.

या बैठकीत प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली असून, त्यानुसारच 2024 पर्यंत 5 लाख 5 हजार कुटुबांना पाणी देण्यासाठी नियोजन करण्याचे ठरल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. शिवाय जीएसडीएलाही लागलीच भुजलाचा अभ्यास करुन माहीती सादर कऱण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षात नाशिक जिल्ह्यातील एकही घर नळजोडणीशिवाय राहाणार नाही. अन् प्रत्येक कुटुंबाला नळाचेच पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे यातून सध्या दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या