Friday, May 3, 2024
Homeजळगावआम्ही नारायण राणेंना खपवतो...तर खासदार कुठे लागतात?

आम्ही नारायण राणेंना खपवतो…तर खासदार कुठे लागतात?

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आम्ही नारायण राणेंना (Narayan Rane) खपवतो तर खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) कुठे लागतात खासदारांची गिरणा परिक्रमा (Khāsadārān̄cī giraṇā parikramā) म्हणजे स्टंटबाजी (Stunts) आहे. या शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी सोमवारी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर टीका (Comment) केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

- Advertisement -

पालकमंत्री गुलाबराव पाटील रोज ज्या रस्त्याने ये जा करतात त्याच परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतो? तो का थांबत नाही, कुंपनच शेत खातयं, या शब्दांत भाजप खासदार उन्मेष पाटलांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी सोमवारी प्रत्युत्तर दिले.

गिरणा परिक्रमा म्हणजे खासदारांची स्टंटबाजी

खासदार उन्मेश पाटील यांनी कानळदा येथील ज्या कण्व आश्रमातून परिक्रमेला सुरुवात केली. त्याठिकाणी सभागृह हे गुलाबराव पाटलांनी बांधलय, असे म्हणत 27 वर्षांपासून भाजपचा खासदार आहे मात्र मतदारसंघात साधी मुतारीही बांधली नाही. त्या भाजप पक्षाचे खासदार मला काही शिकवतील. गिरणा परिक्रमा करण्यासाठी गिरणा नदीच्या काठावर फिरावे लागते. ही परिक्रमा म्हणजे खासदारांची स्टंटबाजी असल्याचा टोलाही मंत्री पाटील यांनी खासदारांना लगावला.

खासदारांनी माझ्या नांदी लागू नये

खासदार उमेश पाटलांनी माझ्या नांदी लागू नये आम्ही नारायण राणेंना खपवतो तर उन्मेष पाटील काय चीज आहे या शब्दांत गुलाबराव पाटलांनी खासदार उन्मेष पाटलांना प्रत्युत्तर दिले असुन आव्हान दिले आहे. खासदारांनी मतदारसंघात किती विकासकामे केली याबाबत परिक्रमा करावी. सात वर्षांपासून डोक्यावर बोलून बंधारे घेऊन हे फिरताहेत, 27 वर्षापासुन यांचा खासदार आहे, कुठलेही कामे नाहीत, आपण खासदार फंड देवु शकत नाही, शेतरस्ते देवु शकत नाही.

या जिल्ह्यात त्यांना कुणीही हुंगत नाही म्हणून ते गुलाबराव पाटलांची जप करत आहेत मी त्यांना मागेही सांगितले हे गुलाबराव पाटलांच्या नादी लागू नका आम्ही नारायण राणेंना खपवतो तर खासदार उन्मेष पाटील चिल्लर बात आहे असे आव्हानही गुलाबराव पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांना दिले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या