Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशठाकरेंना काळे झेंडे दाखवणार – महंत परमहंसदास यांचा इशारा

ठाकरेंना काळे झेंडे दाखवणार – महंत परमहंसदास यांचा इशारा

अयोध्या । विशेष प्रतिनिधी

‘भारत हे हिंदूराष्ट्र’ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची रोखठोक भूमिका होती. मात्र, सत्तेसाठी उध्दव ठाकरेंनी काँग्रेसशी हात मिळवणी केली. त्यांनी रामभक्तांचा विश्वासघात केला असून त्यांच्या दौर्‍याला आमचा विरोध कायम असल्याचे अयोध्याच्या सर्वात जुन्या तपस्वी आखाडयाचे महंत परमहंसाचार्य परमहंसदास यांनी सांगितले.

- Advertisement -

उध्दव ठाकरे यांच्या दौर्‍याला विरोध का ?

बाळासाहेबांनी नेहमी सांगितले काँग्रेस व राष्ट्रवादीशी कधीही घरोबा करणार नाही. मात्र, उध्दव ठाकरेंनी सत्तेसाठी या दोन्ही पक्षांशी गठबंधन केले. त्यांनी बाळासाहेबांना धोका दिला. त्यामुळे त्यांच्या ताफ़ा मी अडवणार असून त्यांना काळे झेंडे दाखवणार आहे. विश्व हिंदू परिषदेची हिच भूमिका आहे.

हिंदुत्वाचा मुद्दा घेऊनच ते हा दौरा करत आहेत?

गेल्या वेळी त्याच्या दौर्‍याचे आम्ही स्वागत केले होते. ठाकरे यांना आमचा वैयक्तिक विरोध नाही, पण सत्तेसाठी हिंदुत्व न मानणार्‍या कॉग्रेससोबत ते गेले आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेने हिंदुत्व सोडले हे जाहीर करुन पक्षाचे नाव बदलावे. हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार नाही ही घोषणा त्यांनी करावी.

भाजपनेही मुफ्तींशी सख्य केले होते?

काश्मीरात त्यांनी देशविरोधी पीडिपीशी हात मिळवणी केली. त्यावेळेही मी मोदी व शहा यांच्यावर टीका केली होती. नंतर त्यांनी कलम 370 रद्द करुन त्यांनी देशहिताचा निर्णय घेतला. मेहबुबांशी हात मिळवणी करुन काश्मीर प्रश्न निकाली काढला.

उध्दव ठाकरेंची तुम्ही भेट घेणार?

त्यांची भेटही घेणार नाही व याबाबत पत्रव्यवहारही करणार नाही. त्यांनी काँग्रेससोबतची आघाडी तोडली नाही तर पुढील निवडणुकांमध्ये शिवसेना संपून जाईल. राहुल गांधी मंदिरात गेले की टीका लावतात. थोड्या वेळाने टोपी घातलेले दिसतात. उध्दव ठाकरेंनी ज्याप्रमाणे भूमिका बदलली ते पाहता रामदर्शन घेण्याऐवजी त्यांनी मक्केला जावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या