Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रउन्हाच्या झळा सोसायला तयार व्हा! राज्यात 'या' ठिकाणी येणार उष्णतेची लाट, IMD...

उन्हाच्या झळा सोसायला तयार व्हा! राज्यात ‘या’ ठिकाणी येणार उष्णतेची लाट, IMD चा अंदाज

मुंबई | Mumbai

राज्यात (Maharashtra weather update) गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात बदल (Changes in temperature) झाल्याचं पहायला मिळत आहे. (Heat wave in Maharashtra IMD alert)

- Advertisement -

अनेक जिल्ह्यांत तापमानात घट झाल्याचं पहायला मिळत असून वाऱ्यासह पाऊस (Rain) सुद्धा झाला. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच आता राज्यात उष्णतेची लाट (Heat wave) येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Temperature Prediction)

Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना जामीन मंजूर, पोलिसांनी का केली होती अटक?

आयएमडी (IMD) मुंबईचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K. S. Hosalikar) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. पुढील आठवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट धडकणार असून होळीपर्यंत तापमान तब्बल ४४ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा सुरुवातीपासूनच राज्यातील जनतेचा घाम फोडणारा ठरत आहे. (India Meteorological Department)

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये आज आणि उद्या तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, रायगड, पालघर, ठाण्यात आज उष्णतेचा पारा वाढला आहे. तर उद्या (१४ मार्च) देखील हीच स्थिती कायम राहणार आहे.

‘साई’नामाच्या गजरात शिर्डीत पार पडली परिक्रमा

दरम्यान, या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात गहू, हरभरा, बाजरी, सूर्यफूल, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता आकाश निरभ्र आणि तापमान वाढणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या