Sunday, June 21, 2026
HomeराजकीयWest Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होणार? सुरुवातीच्या कलानुसार भाजपने...

West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होणार? सुरुवातीच्या कलानुसार भाजपने ओलांडला ‘जादूई आकडा’; ममता दीदींना भवानीपूरमध्ये ‘काँटे की टक्कर’

कोलकाता । Kolkata

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये बंपर मतदान झाले होते. इथं ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला शह देण्याच्या तयारीत भाजप आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच समोर आलेल्या सुरुवातीच्या कलानुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असून सत्तेच्या दिशेने ‘जादूई आकडा’ ओलांडला आहे.

- Advertisement -

एकूण २९४ जागांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत आतापर्यंत सर्व जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजपने १४६ जागांवर आघाडी घेतली असून, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १४८ या आकड्याच्या ते अत्यंत जवळ पोहोचले आहेत. दुसरीकडे, सत्तेत असलेली तृणमूल काँग्रेस (TMC) १०२ जागांवर आघाडीवर असून, काँग्रेसला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागत आहे. यंदा झालेल्या ९२ टक्क्यांच्या विक्रमी मतदानामुळे राज्यात सत्तांतराची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात अटीतटीची लढाई सुरू आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला ममता बॅनर्जी पिछाडीवर होत्या, मात्र त्यानंतर त्यांनी कमबॅक करत ३००० मतांची आघाडी घेतली आहे. सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

बंगालच्या रणांगणात ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाला भाजपने दिलेले हे आव्हान ऐतिहासिक ठरताना दिसत आहे. हे केवळ सुरुवातीचे कल असले तरी १५ ते २० फेऱ्यांची मतमोजणी अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे बंगालच्या गादीवर कोण बसणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दुपारी २ वाजेपर्यंत बंगालचा नवा ‘नवाब’ कोण, याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

राज-का-रण : निष्ठेचा महामेरू

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक आजच्या अस्थिर, बेताल अन् बाजारू राजकारणात ‘उत्तम व्यवहार’ बाजूला राहून केवळ ‘पैशांचा व्यवहार’ सुरू आहे. सत्ता,...