नाशिक | Nashik
शिक्षण पूर्ण झाले किंवा त्याआधी जर आपण रोजगाराच्या शोधात असू तर आपल्याला Resume किंवा CV ( Curriculum Vitae) तयार करावा लागतो. परंतु हे दोन्ही शब्दांचे अर्थ हे वेगवेगळे आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.
CV हे मूळच्या लॅटिन शब्द Curriculum Vitae चे संक्षिप्त स्वरूप आहे. ज्याचा शब्दशः अर्थ होतो ‘जीवनाच्या मार्गक्रमणाचे वर्णन’ CV मध्ये तुमच्या करियरच्या माहितीसह वैयक्तिक माहिती असते.
तुमचा CV हे तुमच्या आतापर्यंतच्या सर्व अभिमानास्पद कामगिरीचे आणि त्याच्याशी निगडित सर्व कागदपत्रांचे संकलन असते. तर दुसरीकडे Resume हे तात्कालिक कारणासाठी अथवा एखाद्या विशिष्ट्य रोजगार संधी साठी तयार केलेले एक आटोपशीर पण मुद्देसूद माहितीपत्रक असते.
Resume ची मांडणी जेवढी लहान आणि मुद्देसूद तेवढा त्याचा जास्त प्रभाव पडतो. बहुतेकदा Resume ची मांडणी १ पानातच पूर्ण व्हायला हवी. परंतु तुम्हाला १५ किंवा अधिक वर्षांचा अनुभव असल्यास त्यात अजून एका पानाची भर पडली तरी हरकत नाही.
Resume सोबत नेहमी cover letter सुद्धा जोडलेले असावे. Cover letter हे एखादी रोजगार संधी स्वीकारण्या विषयीचा तुमचा विचार आणि निश्चय दाखवते. या मध्ये तूमचे आजवरचे अनुभव आणि तुम्ही वापरलेली साधने या संधी साठी कशा उपयोगी आहेत, हे सांगत असते.
आता आपण CV आणि Resume यांतील महत्वाचे फरक पाहुयात.
Resume हा एका पानाचा असावा. CV हा तुमच्या अनुभवानुसार सविस्तर अशा २ ते ३ पानांचा असू शकतो.
CV हा मुख्यत्त्वे शैक्षणिक किंवा Phd सारख्या अभ्यासक्रमांसाठी वापरला जातो तर resume रोजगार संधींसाठी वापरला जातो.
CV मध्ये साधारणतः तुमचे शैक्षणिक यश अधोरेखित केलेले असते. तर Resume मध्ये तुमचे व्यावसायिक अनुभव महत्वाचे असतात
नोकरी च्या संधी शोधात असताना मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला नक्की काय माहिती हवी आहे हे समजणे फार महत्वाचे असते. त्यावेळी CV आणि Resume या शब्दांमध्ये आपला गोंधळ व्हायला नको.





