Tuesday, December 3, 2024
Homeभविष्यवेधकाय आहे माता ब्रह्मचारिणी मंदिर,काशी येथील इतिहास ?

काय आहे माता ब्रह्मचारिणी मंदिर,काशी येथील इतिहास ?

शारदीय नवरात्रीमध्ये देशातील सर्व देवी मातेच्या मंदिरात भक्तांची गर्दी पहावयास मिळते. भारतात नवरात्री या उत्सवाला विशेष महत्व आहे. तसेच भारतात अनेक जागृत देवी मंदिरे आहे. त्यापैकीच आहे माता ब्रह्मचारिणी मंदिर जे उत्तर प्रदेशातील काशीमध्ये स्थित आहे. नवदुर्गा पैकी माता ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. तसेच नवरात्रीचा दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीला समर्पित आहे.

माता ब्रह्मचारिणीचे प्रसिद्ध मंदिर काशीमध्ये स्थित आहे. भगवान शंकरांना आपल्या पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने माता ब्रह्मचारिणी रूपात कठीण तपश्चर्या केली होती. यामुळे देवी सृष्टीवर ब्रह्मचारिणी नावाने ओळखली जाऊ लागली. याकरिताच महादेवाची नगरी काशीमध्ये माता ब्रह्मचारिणीचे मंदिर स्थित आहे. हे मंदिर खूप भव्य आणि सुंदर आहे.

नवरात्रीमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने भक्त इथे दर्शनासाठी येतात. तसेच येथील अशी मान्यता आहे की, जो पण भक्त नवरात्रीच्या दिवशी येथे डोके टेकवून दर्शन घेतो त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच देवीचा आशीर्वाद भक्ताला मिळतो. तसेच त्याच्या जीवनात सुख आणि समाधान टिकून राहते. तसेच माता ब्रह्मचारिणी मंदिर फक्त काशीमध्येच नाही तर अनेक ठिकाणी सुद्धा स्थापित आहे. काशीमधील गंगा किनारी बालाजी घाट वर स्थित असलेल्या या माता ब्रह्मचारिणी मंदिरामध्ये नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होते.

तसेच असे म्हणतात की, माता ब्रह्मचारिणी देवीचे दर्शन घेतल्याने परब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्मचारिणी मातेच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. देवीचे हे रूप खूप सुंदर आहे. काशीमधील ब्रह्मचारिणी मंदिरात केवळ स्थानिक लोकच दर्शनासाठी येत नाहीत, तर इतर राज्यांतील भक्तदेखील दर्शनासाठी आणि पुजेसाठी येतात. माता आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या