आपल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी असे प्रत्येकाला वाटते. आपण हाती घेतलेलं काम नीट व्हावं, यात आपल्याला यश मिळावं. शुभकार्य करण्यापूर्वी काय केलं पाहिजे याबद्दल उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय पाळल्यास तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळतं. तुमची आर्थिक प्रगती होते. पण तुमचं एक चुकीचं पाऊल तुमचं मोठं नुकसान करु शकते. म्हणून म्हणतात सकाळी घरातून बाहेर पडताना तुम्ही कुठला पाय आधी टाकता यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.
होय, घराबाहेर जात असाल तर तोंड गोड करून जा, किंवा दही खाऊन जा, असं अनेकदा सांगितलं जातं. तुमची परीक्षा असेल किंवा तुम्ही इतर काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर दही-साखर खाऊन जा, म्हणजे तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होऊ शकता. या सर्व छोट्या-छोट्या समजुतींचा आपल्या जीवनावर परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळते तसंच मन सकारात्मक राहतं.
असं मानलं जातं की जर सकाळी लवकर घराबाहेर जात असाल तर सर्वात आधी तुमचा उजवा पाय घराबाहेर ठेवा. सर्वप्रथम उजवा पाय घराबाहेर ठेवणे खूप शुभ मानलं जातं. असे केले तर दिवस चांगला जातो, असं म्हणतात. जेव्हा तुम्ही गृहप्रवेश करता, घरात पाऊल ठेवता तेव्हाही तुम्हाला तुमच्या उजव्या पायाने प्रवेश करण्यास सांगितला जातो. दुसरीकडे, लग्नानंतर नवीन नवरी पहिल्यांदा घरी येते तेव्हा ती उजव्या पायाने कलशाला पाय लावून उंबरा ओलांडते.. पण जर तुम्ही डावा पाय घराबाहेर ठेवला किंवा गृहप्रवेश करताना डावा पाय पहिले टाकला तर तुमचं नुकसान होऊ शकतं.
घरातून बाहेर पडताना कोणता पाय पुढे ठेवावा ?

ताज्या बातम्या
Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...
पुणे | Pune
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...