Sunday, November 1, 2026
Homeक्राईमCrime News : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या

Crime News : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

पत्नीचे चुलत सासर्‍यासोबत असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून होणार्‍या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका 36 वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील शाहूनगर येथे घडली आहे. धम्मसागर तुकाराम घोडके (वय 36, रा. शाहूनगर, मिरजगाव, ता. कर्जत) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

- Advertisement -

याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी धम्मसागर यांच्या आई विजया तुकाराम घोडके (वय 52) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शांताराम बापू घोडके, संग्राम शांताराम घोडके आणि मयताच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत धम्मसागर घोडके हे मिरजगाव येथे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पत्नीचे शांताराम बापू घोडके (रा. मिरजगाव) यांच्याशी गेल्या दीड वर्षांपासून कथित संबंध असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याबाबत धम्मसागर व त्यांच्या कुटुंबीयांनी संबंधितांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही धम्मसागर यांना मानसिक त्रास देणे आणि खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याच्या धमक्या देणे सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मारहाणीनंतर आत्महत्या 25 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री धम्मसागर यांना शांताराम घोडके, त्यांचा मुलगा संग्राम आणि मयताची पत्नी यांनी डुकरी नदीजवळ रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मानसिक तणावाखाली असलेल्या धम्मसागर यांनी रात्री साडेअकराच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. कुटुंबीय व शेजार्‍यांनी त्यांना तातडीने मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करावी, अन्यथा मयताच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम मिरजगाव पोलीस ठाण्यासमोर करण्यात येईल, असा इशारा धम्मसागर यांच्या नातेवाईकांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महिला शेतकरी नोंदणी, प्रमाणपत्र वितरणात नगर राज्यात अव्वल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महिला शेतकर्‍यांना स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत नगर जिल्ह्याने राज्यात अव्वलस्थान पटकावले आहे. जिल्ह्यात 30 ऑक्टोबरअखेर तब्बल 3...