Thursday, September 24, 2026
Homeक्राईमपत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पत्नीवर संशय घेऊन तिचा साडीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपी पतीला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. संतोष परसराम पटोरकर (वय 32, रा. बिबामल, ता. धारणी, जि. अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मंगेश दिवाणे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.

- Advertisement -

संतोष पटोरकर हा त्याची पत्नी व चार वर्षांची मुलगी यांच्यासह अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील ब्रीज इंडस्ट्रीज कंपनी येथे मुक्कामासाठी आला होता. 3 एप्रिल 2021 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास संतोष, त्याची पत्नी आणि चार वर्षांची मुलगी कंपनीच्या सुरक्षा केबिनमध्ये झोपले होते. रात्रीच्या वेळी सुरक्षा केबिनमध्ये अन्य कोणी नसल्याचा फायदा घेत संतोष याने पत्नीवर संशय घेत तिच्याशी वाद घातला. त्यानंतर तिच्याच साडीने तिचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.

घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी केला. तपास पूर्ण करून त्यांनी आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यात घटनास्थळाशी संबंधित पुरावे, वैद्यकीय पुरावे तसेच सीसीटीव्ही फुटेज यांना महत्त्व प्राप्त झाले. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मंगेश दिवाणे यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा ठोठावली. पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी व अंमलदार एस. के. गुंजाळ यांनी पैरवी अधिकारी म्हणून त्यांना सहकार्य केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 2 नोव्हेंबरला मतदान

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकार बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 2 नाव्हेेंबरला मतदान प्रक्रिया पार पडून 3 नाव्हेंबरला मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत प्रारूप निवडणूक...