Thursday, July 23, 2026
Homeक्राईमCrime News : पत्नीची हातोड्याने हत्या करणार्‍या पतीला जन्मठेप

Crime News : पत्नीची हातोड्याने हत्या करणार्‍या पतीला जन्मठेप

कोपरगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

कोळपेवाडी |प्रतिनिधी| Kolpewadi

चारित्र्याच्या संशयावरून पोटच्या गोळ्यांसमान असलेल्या पत्नीची हातोड्याने निर्घृण हत्या करणार्‍या नराधम पतीला कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली. अरुण रतन दाभाडे (रा. टिळेकर वस्ती, कोपरगाव) असे या आरोपीचे नाव असून, न्यायाधीश डी. डी. अलमले यांनी आरोपीला 5 हजार रुपये दंडासह ही कठोर शिक्षा ठोठावली आहे.

- Advertisement -

ही सुन्न करणारी घटना 19 फेब्रुवारी 2024 रोजी घडली होती. मयत महिला ही दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील आचारी हॉस्पिटलमधून जेवण करण्यासाठी जेऊर पाटोदा येथील घराकडे पायी जात होती. त्याचवेळी वाटेत दबा धरून बसलेल्या अरुण दाभाडे याने संशयाच्या भरात तिच्यावर हल्ला चढवला. सोबत आणलेल्या लोखंडी हातोड्याने पत्नीच्या डोक्यात सपासप वार करून तिला जागीच ठार मारले होते. या घटनेने संपूर्ण कोपरगाव तालुका हादरून गेला होता.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत गांभीर्याने तपास चक्र फिरवली होती. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी घटनेचा पंचनामा आणि पुराव्यांचे संकलन करून तातडीने दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील शरद गुजर यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना 12 महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय पुराव्यांनी आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावली.

दोन वर्षांच्या आत या प्रकरणाचा तपास, साक्षी-पुरावे आणि अंतिम निकाल लागल्याने न्यायालयीन प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या खटल्यात महिला फौजदार नंदा गलांडे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष माळी, फटांगरे आणि वर्पे यांनी पैरवी अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. संशयापायी संसार उद्ध्वस्त करणार्‍या या नराधमाला अखेर त्याच्या कर्माची शिक्षा मिळाल्याची भावना समाजमाध्यमांतून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...