Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकमधील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नाशिकमधील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

- Advertisement -

गृहनिर्माण धोरणानुसार 4000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांमध्ये 20 टक्के घरे ही ईडब्ल्यूएस व एलआयजी घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील याबाबतच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असे उत्तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिले.

विधानसभेत सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, नाशिक येथील गृहनिर्माण क्षेत्रातील या प्रकारात बनावट नकाशे, बनावट मोजणी, तसेच बनावट दस्तऐवज तयार करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काही विकासकांनी आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने भूखंडांचे छोटे-छोटे तुकडे करून या नियमाला बगल देत गरीबांना घरांपासून वंचित ठेवले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या तपासात एकूण काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. काही ठिकाणी एकाच दिवशी भूखंडांचे तुकडे करून मंजुरी घेण्यात आली, ज्यामुळे हा प्रकार संगनमताने केल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणात नाशिक येथील विकासकांसह संबंधित शासकीय अधिकारी, महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून ती महिनाभरात अहवाल सादर करेल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

शरद पवारांची विलीनीकरणावर खुली ऑफर; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतून पहिली प्रतिक्रिया

0
मुंबई । Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व फुटीनंतर दोन्ही तट एकत्र येण्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलेले असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (सुनेत्रा पवार गट) वरिष्ठ नेत्यांनी या...