Monday, May 20, 2024
Homeधुळेधुळ्यातील पाणीप्रश्नात लक्ष घालणार

धुळ्यातील पाणीप्रश्नात लक्ष घालणार

धुळे । Dhule। प्रतिनिधी

धुळे शहराच्या चहूबाजूला पाणी असूनही धुळेकरांना कायमच पाच दिवसाआड आणि आता तर दहा-बारा दिवसाआड पाणी मिळते आहे. ही बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर, असे असेल तर प्रश्न गंभीर आहे. आपण नक्कीच लक्ष घालू, असे आश्वासन खा.सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिले.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे या आज धुळे दौर्‍यावर होत्या. सकाळच्या सत्रात संवाद परिषद आटोपल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. खा.सुळे म्हणाल्या, भोंगा, हनुमान चालीसा या विषयांपेक्षा आपल्यासमोर जनतेला भेडसवणार्‍या महागाईचा विषय मोठा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) जातीपातीचे, धर्माच्या नावावर राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करण्यावर नेहमीच भर देत आहे.

कोरोनामुळे सार्‍यांचीच आर्थिक घटी विस्कटली आहे. उद्योग धंद्यावर परिणाम झाले तसे सामान्य माणसाच्या हातचा रोजगारही गेला. असे असतांना दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे जगणे मुश्किल झाले आहे. नुसता लिंबूचा दर विचारात घेतला तरी सामान्य माणसाच्या खिशाला बसणारी छळ लक्षात येवू शकते. म्हणूनच पंतप्रधानांना आपली विनंती आहे की, त्यांनी महागाईच्या मुद्यांवर देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर बैठक बोलवावी आणि आपल्या स्तरावरुन महागाई नियंत्रणाबाबत निर्णय घ्यावा असेही त्या म्हणाल्या.

राजकारण, आरोप, प्रत्यारोप या विषयांना फारसे महत्व न देता खा.सुळे यांनी आम जनतेच्या प्रश्नाबाबत भाष्यकरणे पसंत केले. त्यातच धुळ्यातील पाणीटंचाईचा प्रश्न पत्रकारांनी निदर्शनास आणून दिला. डेडरगाव, नकाणे तलाव, हरणमाळ धरण, अक्कलपाडा प्रकल्प आणि तापी पाणीपुरवठा योजना असे चहुबाजूने पाणी उपब्ध असतांना आणि प्रकल्पांमध्ये पुरेसा साठा असतांना देखील धुळेकरांना आठ-दहा दिवसाआड पाणी मिळते. हे लक्षात आणून देताच खा.सुळे यांनी आपल्या डायरीत हा मुद्दा नोंद करीत संबंधित अधिकार्‍यांसोबत चर्चा करुन नेमके नियोजन बिघडते आहे की, राजकारण होतेय, हे समजून घेवून या प्रश्नात आपण स्वतः लक्ष घालु. पाणी असेल तर ते मिळालेच पाहिजे हा मुद्दा त्यांनी मांडला.

कार्यकर्त्यांशी साधला संवाद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा स्तरावरील पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे नवीन जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरच पुर्ण होईल. प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील हे अभ्यासू आणि हुशार नेते आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. पवारसाहेब, अजितदादा आणि ना.जयंत पाटील हे जो निर्णय घेतील तो अंतिम राहील असेही त्या म्हणाल्या. पत्र परिषदेनंतर राष्ट्रवादी भवनात जावून त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पक्ष बांधणीच्या अनुशंगाने संवाद साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या