Monday, April 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपुढील तीन वर्षे राज्यभर फिरून संघटना मजबूत करणार — खासदार संजय राऊत

पुढील तीन वर्षे राज्यभर फिरून संघटना मजबूत करणार — खासदार संजय राऊत

नाशिक दौर्‍यात राजकीय घडामोडींवर आक्रमक भूमिका

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आजारपणानंतर प्रथमच नाशिक दौर्‍यावर आलेले शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपनेते खा. संजय राऊत यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर आक्रमक भूमिका घेत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पुढील तीन वर्षे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार व्यक्त केला. सकाळी एका न्यायालयात हजेरी लावल्यानंतर मालेगावच्या न्यायालयात उद्या हजेरी असल्याने नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

- Advertisement -

खा. राऊत यांच्या दौर्‍यामुळे स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून आगामी काळात संघटनात्मक बांधणीवर त्यांचा भर असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मालेगाव न्यायालयात उद्या उपस्थित राहणार असून, त्यानंतर शहरात कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या भेटी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष संघटना बांधणीचे काम आता अधिक वेगाने हाती घेतले जाणार असून,. पुढील तीन वर्षे राज्यभरात निवडणूका नसल्याने विशेष दौरे करून संघटना घट्ट करण्याचा मानस असल्याचे खा राऊत यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेसाठी मंत्री छगन भूजबळ इच्छुक असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता राऊत म्हणाले, भुजबळ यांना अनेक वर्षांपासून दिल्लीत जायचे आहे. त्यांनी अनेकदा लोकसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत. वरिष्ठ नेत्यांसाठी संसदेतील हे पद योग्य व्यासपीठ आहे. त्यामुळे त्यांनी जावे असे ते म्ंहणाले.

भिवंडीतील काँग्रेसच्या राजकीय हालचालींवर भाष्य करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला.भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा फुटला. भिवंडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली. बदला घेतला असे कोणी म्हणत असतील तर आपण त्यांचे स्वागत करतो, असे ते म्हणाले. चंद्रपूर महापौर निवडीच्या संदर्भात काँग्रेसने केलेल्या वक्तव्यावर राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली होती. शेवटपर्यंत काँग्रेसच्या अंतर्गत दोन गटांमध्ये संवाद सुरू होता; मात्र त्यांच्यात एकमत झाले नाही. त्यामुळे प्रयत्न अपयशी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोळपकरांच्या मुद्द्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले. कोळपकर हे मूळचे शिवसेनेचे. शिवसेनेत असताना ते आक्रमक भूमिका मांडत होते. आज सरकारमध्ये आहेत; मात्र ते हतबल दिसत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

ताज्या बातम्या

Kopargaon : सोनेवाडीच्या तरुणाचा कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कष्टाने मिळवलेले यश आणि कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. कोपरगाव...