Friday, May 3, 2024
Homeनगरभिशीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेला दांडक्याने मारहाण

भिशीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेला दांडक्याने मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिशीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना बोल्हेगाव येथे घडली. या प्रकरणी शमीम रौप बागवान (वय 40 रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

धारदार तलवारीसह तरुणास पोलिसांनी पकडले ; गुन्हा दाखल

बबिता बाळु शिंदे (रा. महादेव मंदीरसमोर, गांधीनगर, बोल्हेगाव) हिच्या सह दोन व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबिता शिंदे यांच्याकडे फिर्यादीने भिशी लावली होती. भिशी संपल्यानंतर फिर्यादी पैसे मागण्यासाठी गेल्या असता थांबा थोडे दिवस असे म्हणत शिंदे पैसे देण्यास टाळाटाळ करत होती.

संगमनेरातील ‘त्या’ मालमत्ताधारकाला नगरपरिषदेची नोटीस

फिर्यादी पुन्हा पैसे मागण्यासाठी गेल्या असता पैसे देण्यास नकार देत शिंदे हिने शिवीगाळ केली. तिथे असलेल्या दोन अनोळखी इसमांना शिंदे हिने फिर्यादीला मारहाण करण्यास सांगितले. अनोळखी इसमांनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अकोलेत होणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन

- Advertisment -

ताज्या बातम्या