Tuesday, September 15, 2026
Homeजळगावब्लॅकमेलिंगमुळे केली त्या महिलेने आत्महत्या

ब्लॅकमेलिंगमुळे केली त्या महिलेने आत्महत्या

जळगाव jalgaon

शहरातील जुने जळगावातील भावसार मढी समोरील जोशी पेठ (Joshi Peth)मधील वास्तव्यास असलेल्या चाळीस वर्षीय विवाहीतेने (Married) ब्लॅकमेलिंगला कंटाळून (Tired of blackmailing) आत्महत्त्या (Suicide) केल्याची घटना घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा(crime) दाखल करण्यात आला असून संशयीतास अटक (Suspect arrested) करण्यात आली आहे.

- Advertisement -

शहरातील जोशीपेठ परिसरातील रहिवासी जुबेर अब्दुल करीम खाटीक (Zubair Abdul Karim Khatik) (वय-४५) कपडे विक्रीचा व्यवसाय करत ते दोन मुल व पत्नीसह ते वास्तव्यास आहेत. दि. ८ रोजी जुबेर खाटीक हे मुलाला शाळेतून घेवुन घरी पेाहचले. तेव्हा त्यांना घरात पत्नी फिरदोसबी (Wife Firdosbi) हिने गळफास घेतल्याचे आढळून आले. तत्काळ तीला खाली उतरवुन जिल्‍हारुग्णालयात (District Hospital) दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आल्यावर मयत विवाहीतेवर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. दरम्यान मयतेच्या अंत्यविधीनंतर दुसऱ्या दिवशी जुबेर खाटीक देाघं मुलांसह कबरस्थान येथे गेले असता त्यांना अगोदरच कुणीतरी येवुन कबरीवर विटा लावून गेल्याचे आढळून आले.

पत्नी असल्याचे सांगत लावल्या विटा

जुबेर खाटीक यांनी कबरस्थानात त्यांनी चौकशी केली असता संशयित आदील (suspect Adil) ऊर्फ नट्टू अल्ताफ खाटीक याने मयत व्यक्ती (Deceased person) माझी पत्नी (Wife) असल्याचे सांगत विटा लावल्याचे सांगण्यात आले. घडल्या प्रकारात समाजातील लोकांना एकत्र करुन चौकशी केली असता आदील ऊर्फ नट्टू अल्ताफ खाटीक याचे फिरदोसबी सेाबत संबध असल्याचे पोलिसांना (police) चौकशीत उघडकीस आले.

बदनामीच्या धमकीमुळे केली आत्महत्या

जुबेर याने मयत महिलेकडे पन्नास हजारांची मागणी केली हेाती. तसेच पैसे न दिल्यास समाजात बदनामी (defame) करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरुन फिरदोस बीने आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आल्यावरुन शनिपेठ पोलिसांत आदिल ऊर्फ नट्टू अल्ताफ खाटीक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होवुन अटक (Suspect arrested) करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करत आहे.

ताज्या बातम्या

आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजेच….; सर्वोच्च न्यायालयात शिंदेंच्या वकिलांचा जोरदार प्रतिवाद

0
मुंबई । Mumbai सत्तासंघर्षाच्या नाट्यामध्ये 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह कुणाचे, यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला न्यायालयीन संग्राम आता अत्यंत निर्णायक वळणावर आला...