Friday, May 3, 2024
Homeनगरवीजवाहक तार अंगावर पडून शिंदे येथे महिलेचा मृत्यू

वीजवाहक तार अंगावर पडून शिंदे येथे महिलेचा मृत्यू

कुळधरण (वार्ताहर) – उच्च दाबाची वीजवाहक तार अंगावर पडून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील शिंदे गावानजीकच्या उंबराचे लवण येथे घडली. सुरेखा अनिल ननवरे (वय : 40) असे मृत महिलेचे नाव असून त्या धुणे धुण्यासाठी गेलेल्या होत्या.शुक्रवारी (दि.13) सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, हेड कॉन्स्टेबल पांडुरंग वीर, वीज वितरणचे अधिकारी कुलकर्णी घटनास्थळी पोहोचले. लोखंडी पत्रे उभे करून तयार केलेल्या घरात राहत असलेल्या सुरेखा ननवरे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. त्या कुटुंबातील कर्त्या व्यक्ती होत्या.त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

- Advertisement -

शिंदे येथील वीजतारा अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या होत्या. दुरुस्ती करण्यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी करून पाठपुरावा केला होता. मात्र वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेतली नव्हती. अखेर ननवरे त्याच्या बळी ठरल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या