Monday, May 20, 2024
Homeजळगावचितेगाव येथे विज पडून महिलेचा मृत्यू

चितेगाव येथे विज पडून महिलेचा मृत्यू

चाळीसगाव Chalisgaon । प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यात गेला तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने (Back with the rain) दमदार हजेरी (Strong presence) लावली. यामुळे तालुक्यात शेतपिकांचे (crops) नुकसान (damage) झाले आहे. तर तालुक्यातील चितेगाव (Chitegaon) येथे शेतात काम करत असलेल्या महिलेच्या अंगावर (woman’s body) विज पडून (struck by lightning) तिचा जागीचा मृत्यू (Death on the spot) झाला आहे. पावसामुळे नूकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे (Panchnama) करण्याचे आदेश तहसीलदार (Tehsildar) अमोल मोरे यांनी दिले असून नेमके किती नूकसान झाले यांची आकडेवारी दोन दिवसात कळणार आहे.

- Advertisement -

तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावासने दमदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील शिंदी, घोडेगाव, राजदेहरे, हातगाव, गणेशपूर यागावासह अनेक गावातील शेतपिकाचे परतीच्या पावासामुळे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कपाशीला मोठा फटका बसला.

ऐन दिवसाळीतच परतीच्या पावसाने कहर केल्याने खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. शेतकर्‍यांचे हक्काचे पांढरे सोने कंपाशी पिकाला यंदा चांगला भाव मिळणार असल्याची अपेक्षा शेतकर्‍यांची होती. परंतू परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे हातातोडाशी आलेला घास हिसकावून नेला आहे.

त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. शासनातर्फे त्वरित पंचनामे करुन, शेतकर्‍यांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

चितेगाव येथे विज पडून महिलेचा मृत्यू

तालुक्यातील चितेगाव येथे एक 50 वर्षीय महिलेच्या अंगावर विज पडून तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. संगीताबाई सुरेश शिंदे असे मयत महिलेचेे नाव आहे.

मयत संगीताबाई या दि,17 रोजी नेहमीप्रमाणे इतर महिलासोबत शेतात काम करीत होत्या. सायंकाळी घरी जाण्यासाठी सर्व महिला शेतातून निघत असताना, संगीताबाई ह्या एकट्या गवत घेण्यासाठी लिंबुच्या बागेत गेल्या आणि तितक्यात वादळासह विजेच्या कडकडात झाला आणि अचानक त्यांच्या अंगावर विज पडली.

यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पढील तपास पोलीस करीत आहेत.

तालुक्यातील शिंदी, घोडेगाव परिसरात परतीच्या पावासामुळे शेतपिकांचे नूकसान झाले. नूकसानग्रस्त भागात पंचनामे करण्यासाठी आमच्या कर्मचार्‍यांना आदेश दिले असून पंचनामे पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल तयार करुन शासनाकडे पाठविला जाईल.

अमोल मोरे, तहसीलदार

- Advertisment -

ताज्या बातम्या