Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : 25 लाखांसाठी महिला डॉक्टरचा छळ

Crime News : 25 लाखांसाठी महिला डॉक्टरचा छळ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 25 लाख रुपये आण म्हणत एका डॉक्टर महिलेचा छळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी आकीफ इनामदार, रूकैय्या इनामदार, जैनुद्दीन इनामदार, आरीफ इनामदार, उजमा इनामदार, जबीन शेख, बशीर शेख, शमा पटेल, शकीला पटेल, दाऊद पटेल, सर्व रा. मुंबई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यास्मीन आकीफ इनामदार, (वय 29, रा. वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर) या महिला डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, ऑक्टोबर 2022 मध्ये तिचा विवाह मुंबईच्या आकीफ जैनूद्दीन इनामदार याच्याबरोबर झाला. लग्नानंतर सासरी राहत असताना काही महिन्यानंतर सासरच्यांनी चांगले नांदवल्यानंतर दुसरा फ्लॅट घ्यायचा असल्याने त्यासाठी 25 लाख रुपये लागतात.

- Advertisement -

तू तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, बाकीचे पैसे तू डॉक्टर असल्याने तुझ्या नावावर कर्ज घे, पण पैसे आणून दे, असे म्हणत शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. याबाबत आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी सासरच्या लोकांची समजूत काढली. मात्र, सासरचे लोक शारीरिक आणि मानसिक त्रास देतच राहिले. दरम्यान, आपण गर्भवती राहिल्याने त्रास देऊ नये अशी वारंवार विनंती करून ही माहेरून पैसे आणत नाही म्हणून मारहाण करण्यात आली. गर्भवती असताना मारहाण केल्याने प्रचंड वेदना झाल्या, त्यानंतर माझे वडील मला माहेरी श्रीरामपूरला घेऊन आले.

YouTube video player

नंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने बैठक घेऊन सासरच्यांना समजून सांगून पुन्हा मला नांदायला पाठवले, परंतु त्यानंतरही नवरा आणि सासू यांनी हुंड्याच्या पैशावरून त्रास दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे. यास्मीन इनामदार या महिला डॉक्टरच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...