Friday, May 3, 2024
Homeनगरबिबट्याच्या हल्यात महिला जखमी

बिबट्याच्या हल्यात महिला जखमी

खरवंडी कासार | वार्ताहार | Kharvandi Kasar

पाथर्डी तालुक्यातील भगवानगड लमाण तांडा येथील एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

- Advertisement -

छ्बुबाई एकनाथ राठोड (वय४५) या शेतात काम करत असतांना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या चेहऱ्यावर पंजा मारत त्यांना जखमी केले आहे. बिबट्याने जेव्हा हल्ला केला त्यावेळी त्यांचे अपंग पती एकनाथ दासू राठोड देखील त्यांच्या सोबत होते. त्यांनी बिबट्याला दगड मारला असता बिबट्या तेथून फरार झाला. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य किरण खेडकर, मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप पवळे, विजय राठोड, पोपट राठोड, दत्तु राठोड व परीसरातील युवकानी त्यांना खरवंडी कासार येथिल दिपक हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे. डाॅ.आश्रुबा जायभाये यांनी महिलेवर उपचार केले. घटनेची माहीती मिळताच वनविभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेण्यासाठी भगवानगड जंगल परीसरात सर्वोपरी प्रयत्न करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या