Friday, May 3, 2024
Homeनगरमुख्यालयात राहणार्‍या महिला पोलिसाचे घर फोडले

मुख्यालयात राहणार्‍या महिला पोलिसाचे घर फोडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील सर्जेपुरा येथील पोलीस मुख्यालयात राहणार्‍या महिला पोलीस कर्मचार्‍यांचे घर फोडून चोरट्यांनी 40 हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरले. याप्रकरणी महेश शरद खेंडके (वय 31) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे पोलीस मुख्यालयात राहतात. ते खासगी नोकरी करतात. त्यांच्या पत्नी पोलीस दलात नोकरीला आहेत.

- Advertisement -

चोरट्यांनी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या स्वयंपाक खोलीकडील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. सोने-चांदीचे दागिने असा 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला. खेंडके यांनी दिलेले फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार डी.एन. शिरसाठ या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या