Friday, May 3, 2024
Homeनगरमहिलेशी असभ्य वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी

महिलेशी असभ्य वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

विवाहित महिलेशी असभ्य वर्तन करुन तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना नेवासाफाटा येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन खडकाफाटा येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सुंदर ठोंबरे (पूर्ण नाव माहिती नाही) रा. खडकाफाटा ता. नेवासा हा माझ्या घरी मी सकाळी अंगण झाडत असताना आला व माझ्याशी असभ्य वर्तन केले तसेच ती तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून निघून गेला. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर फर्स्ट 630/2022 भारतीय दंड विधान कलम 354, 354(ड), 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या