Thursday, September 10, 2026
Homeक्राईममहिला शिक्षिकेच्या बँक खात्यातून 66 हजार रूपये गायब

महिला शिक्षिकेच्या बँक खात्यातून 66 हजार रूपये गायब

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील एका महिला शिक्षिकेच्या कोटक महिंद्रा बँक खात्यातून 66 हजार रूपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन ट्रान्सफर करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सावेडी उपनगरातील संचारनगर, पाईपलाईन रस्ता येथील महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (13 ऑगस्ट) दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात बँक खातेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, हुंडेकरी लॉनसमोर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या गेल्या सात वर्षांपासून कोटक महिंद्रा बँक, पाईपलाईन रस्ता, अहिल्यानगर येथील बचत खात्याचा वापर करत आहेत. दि. 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2.34 वाजता त्यांच्या मोबाईलवर 66 हजार रूपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला. लगेचच त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून 66 हजार रूपये कमी झाल्याचे उघड झाले. बँकेच्या अधिकार्‍यांनी तत्काळ त्यांचे खाते फ्रिझ केले. तसेच 1 जानेवारी 2025 ते 11 ऑगस्ट 2025 पर्यंतचा बँक स्टेटमेंट देण्यात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. सायबर पोलिसांनी दिलेल्या पावती क्रमांकानुसार, पैसे ज्या खात्यावर ट्रान्सफर झाले त्याचा क्रमांक सांगितला.

या प्रकरणी अज्ञात खातेदाराने कोणत्यातरी पध्दतीने फिर्यादींच्या खात्यातील रक्कम काढून फसवणूक केल्याची खात्री झाल्याने त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : डिंभे-माणिकडोह बोगद्यावरून पुन्हा प्रादेशिक वादाची ठिगणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मुद्द्यावरून नगर आणि पुणे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच, नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी आपली आक्रमक आणि ठाम भूमिका स्पष्ट केली...