Monday, October 5, 2026
Homeक्राईमCrime News : दोन महिलांनी वृध्देचे चार तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविले; गुन्हा...

Crime News : दोन महिलांनी वृध्देचे चार तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविले; गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सोन्याचे दागिने मोडून जास्त सोने देण्याचे आमिष दाखवत दोन अनोळखी महिलांनी वृध्द महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडील सुमारे चार तोळ्याचे सोन्याचे दागिने लबाडीने लांबविल्याची घटना शहरातील आशा टॉकीज चौक ते मार्केट यार्ड परिसरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दोन अनोळखी महिलांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

सरस्वती दादाभाऊ राऊत (वय 75, रा. आकोळनेर, जाधववाडी, ता. अहिल्यानगर) यांनी याबाबत शनिवारी (12 सप्टेंबर) फिर्याद दिली आहे. गुरूवारी (10 सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सरस्वती राऊत या आशा टॉकीज चौक परिसरात आल्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी महिलांनी त्यांच्याशी ओळख काढली. बोलण्यातून विश्वास संपादन केल्यानंतर या महिलांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने मोडायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर काहीतरी व्यवहार करण्याच्या बहाण्याने त्यांनी राऊत यांना गंजबाजार येथे नेले. गंजबाजार येथून संबंधित महिलांनी राऊत यांना पुन्हा रिक्षामध्ये बसवून मार्केट यार्ड परिसरात नेले. तेथे त्यांनी राऊत यांना, तुमच्याकडील सोने आम्हाला द्या आणि आमच्याकडील त्यापेक्षा जास्त सोने तुम्ही घ्या, असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राऊत यांनी अंगावरील सोन्याचे दागिने त्या महिलांकडे दिले.

त्यानंतर महिलांनी राऊत यांना एक पिशवी दिली. या पिशवीमध्ये सोन्याचे दागिने असल्याचे भासवून ती पिशवी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात त्या पिशवीमध्ये सोन्याऐवजी वाळू भरलेली असल्याचे नंतर लक्षात आले. महिलांनी लबाडीच्या इराद्याने राऊत यांच्याकडील सोन्याचे दागिने घेऊन तेथून पोबारा केला. राऊत यांनी पिशवी तपासल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. फसवणूक झालेल्या दागिन्यांमध्ये अंदाजे दीड तोळे वजनाची, सोन्याचे मणी असलेली बोरमाळ, दोन तोळे वजनाची सोन्याची मोठा मणी असलेली चार पदरी पानपोत, पाच ग्रॅम वजनाच्या कानातील खुटबाळ्यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीतून राम शिंदे यांची माघार

0
अहिल्यानगर । प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम...