नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रीय जनता दलावर टीका केली. राजदची सत्ता असताना बिहारमध्ये भ्रष्टाचार खूप होता, असे म्हटले. यावेळी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेनुसार बिहारच्या ७५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपयांची रक्कम पाठवण्यात आली. दिवाळीपुर्वी मोदींनी हे बिहारला मोठे गिफ्ट दिले आहे.
नवरात्र काळात आपल्याला बिहारच्या नारीशक्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली असे म्हणत, पंतप्रधान मोदी यांनी “आजपासून ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ सुरू होत असल्याची घोषणा केली. तसेच, या योजनेशी आतापर्यंत ७५ लाख भगिनी जोडल्या गेल्या असून, त्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹१०,००० थेट जमा करण्यात आले आहेत, असेही मोदी म्हणाले.
जेव्हा ही प्रक्रिया सुरु होती तेव्हा मी विचार केला की नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये बहिणी आणि मुलींसाठी किती मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जेव्हा कोणतीही बहीण किंवा मुलगी रोजगार किंवा स्वंयरोजगार करते तेव्हा त्यांच्या स्वप्नांना नव बळ मिळते, समाजात त्यांचा सन्मान वाढतो.
मोदींची राजदवर टीका
यावेळी पंतप्रधान मोदींनी आरजेडीवरही थेट हल्ला चढवला. “आरजेडीच्या राजवटीत कुणीही घरातदेखील सुरक्षित नव्हते. याचा सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागला आहे. महिलांनी आरजेडी नेत्यांचे अत्याचार पाहिले आहेत. मात्र, नितीश राजवटीत मुली बिनधास्तपणे रस्त्यांवरून फिरू शकत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सबलीकरणासाठी सरकारने उज्ज्वला योजना आणि ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ सारखे अभियान राबवले आहेत. एवढेच नाही तर, महत्वाचे म्हणजे, महिलांना केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखल्यास त्याचा फायदा समाजाच्या इतर घटकांनाही होतो, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
या अभियानाद्वारे सव्वा चार लाखांहून अधिक आरोग्य शिबिरांचं गावोगावी आयोजन केले जात आगे. कमी रक्त असणं, बीपी, मधुमेह आणि कॅन्सर सारख्या गंभीर उपचारांची तपासणी केली जातेय, असे मोदी म्हणाले. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत एनडीए विरुद्ध महागठबंधन असा सामना असेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





