Friday, May 3, 2024
Homeराजकीयप्रत्येक जिल्ह्यातील काँग्रेस समितीत महिला कार्याध्यक्ष नेमणार

प्रत्येक जिल्ह्यातील काँग्रेस समितीत महिला कार्याध्यक्ष नेमणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महिलांचा राजकारणातील सहभाग Women’s participation in politics आणखी सक्रीय व्हावा यासाठी प्रत्येक जिल्हा काँग्रेस समितीत District congress Committee एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress State President Nana Patole यांनी शुक्रवारी दिली.

- Advertisement -

महिलांना राजकीय प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने नेहमीच महत्वाची भूमिका बजावलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतीकारी निर्णयही काँग्रेस पक्षाच्या सरकारनेच घेतला.

आताही उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी घेतला असून पक्षाच्या पहिल्या उमेदवार यादीत ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे, असे पटोले म्हणाले.

महाराष्ट्रालाही मोठी परंपरा लाभलेली असून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रत्येक जिल्हा काँग्रेस समितीमध्ये एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

स्थानिक पातळीवर महिलांना जास्तीत जास्त संधी देऊन त्यांचा राजकारणातील आणि निर्णयप्रक्रियेतील सहभाग आणखी वाढावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या