Thursday, May 2, 2024
Homeनगरमुरकुटे-कर्डिले यांच्यात रंगला कुस्तीचा डाव

मुरकुटे-कर्डिले यांच्यात रंगला कुस्तीचा डाव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आपल्या वेगळ्या शैलीमुळे जिल्ह्याला परिचीत असलेल्या दोन माजी आमदारांमध्ये (Former MLA) भंडारदरा (Bhandardara) येथील निसर्ग रम्य वातावरणात कुस्तीच फड (Wrestling Phad) रंगला. मात्र दोघांचेही वय पाहता उगाचच ‘रिक्स’ नको म्हणून उत्तरेतील दोन नेत्यांनी हस्तक्षेप करीत ही कुस्ती बरोबरीत सुटल्याचा निकाल देत डाव संपविला. या कुस्तीची जोरदार चर्चा जिह्यात सुरु आहे.

- Advertisement -

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक (Meeting of the Board of Directors of Ahmednagar District Co-operative Bank) बुधवारी भंडारदरा (Bhandardara) येथील शेंडीच्या (Shendi) जिल्हा बँकेच्या शाखेत (District Bank Branch) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके (Udy Shelke), व्हा. चेअरमन सीताराम गायकर (sitaram Gaykar) यांच्यासह ज्येष्ठ संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के (Annasaheb Mhaske), माजी आ. भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute), माजी आ. शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile), यांच्यासह 12 संचालक उपस्थित होते.

बँकेची बैठक आटोपल्यानंतर संचालक मंडळाने भंडारदरा परिसरात फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेअरमन उदय शेळके, व्हा. चेअरमन सीताराम गायकर, अण्णासाहेब म्हस्के, शिवाजीराव कर्डिले, भानुदास मुरकुटे हे सर्व भंडारदरा परिसरात खुललेल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी निघाले. सध्या भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने नेकलेस फॉलचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ही सर्व नेते मंडळी आपल्या कारमधून खाली उतरली. सर्वजण पावसात भिजत आनंद लुटत होती.

त्याचवेळी माजी आ. मुरकुटे यांच्यातील पहिलवान या पावसात जागा झाला. त्यामुळे त्यांनी एकमेकांची मस्करी सुरु केली. त्यातच माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनाही मुरकुटे यांनी डिवचले. कर्डिले हे मुळातच पहिलवान म्हणून ओळखले जातात. मुरकुटे यांनी डिवचल्यानंतर कर्डिले यांनीही दंड थोपटला. मुरकुटे हेही माघार घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे इतर संचालकांच्या उपस्थितीत या ठिकाणी कर्डिले आणि मुरकुटे यांचा कुस्तीचा डाव सुरु झाला. टाळ्या वाजवत काहींनी या कुस्तीला दाद दिली. मुरकुटे उंच असल्याने आणि कर्डिलेंची उंची त्या तुलनेत कमी असल्याने मुरकुटेंनी कर्डिलेंना चितपट करण्याचा प्रयत्न केला.

पण कर्डिलेही हाडाचे चिवट पहिलवान असल्याने त्यांनीही मुरकुटेंना चांगलेच जखडून धरले. बराच वेळ ही झडपड पावसात सुरु होती. एकमेकांवर मात करण्याच्या नादात कोणाला काही दुखापत होऊ नये म्हणून बँकेचे व्हा. चेअरमन सीताराम पाटील गायकर आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी मधे जावून दोघांनाही थांबविले आणि ही कुस्ती बरोबरीत सुटल्याचे सांगत दोघांचेही हात वर केले. त्यांना उपस्थित सर्व संचालकांनी दाद दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या